शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! "मैं बेवफा नहीं हूं..."; पतीच्या फोटोमागे अन् हातावर मेसेज लिहून शिक्षिकेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 09:04 IST

Crime News : एका शिक्षिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षिकेने मृत्यूचे कारणही आपल्या तळहातावर लिहिल्याचं समोर आलं आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शिक्षिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षिकेने मृत्यूचे कारणही आपल्या तळहातावर लिहिल्याचं समोर आलं आहे. सासरच्या मंडळींनी पोलिसांना सुनेने आत्महत्या केल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे माहेरच्यांनी आपल्या मुलीची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. इंदू साहू असं या शिक्षिकेचे नाव आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

"मी स्वेच्छेने आत्महत्या करत आहे. आई-बाबा आणि भाऊ मला माफ करा, माझा मंगळ माझा जीव घेऊन गेला" असं महिलेने आपल्या हातावर लिहिलं आहे. इतकेच नाही तर महिलेने पतीच्या फोटोच्या मागे "मैं बेवफा नहीं हूं" म्हणजे मी विश्वासघातकी नाही, असं देखील लिहिलं आहे. मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही. पोलीस शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इंदू साहू असं शिक्षिकेचे नाव आहे. त्या रायसेन येथील होत्या. तीन वर्षांपूर्वी इंदू यांचं लग्न भोपाळच्या सुभाष साहू नावाच्या व्यक्तीशी झाले होते. इंदू सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. तर त्यांचे पती संगीत शिकवतात. गुरुवारी पती सुभाष याने इंदूच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली. इंदूच्या भावाने त्याच्यावर खुनाचा आरोप केला आहे. बहिणीने ज्या खोलीत आत्महत्या केली त्या खोलीच्या शेजारच्या खोलीत तिचे सासरे बसले होते, हे कसं होऊ शकतं की त्यांना या घटनेची माहिती नाही असा त्यांचा दावा आहे.

इंदूचा पती तिच्या चारित्र्यावर संशय घेत असे. तसेच तिच्यावर अत्याचार करत असे. लग्नादरम्यान मुलीला सोन्याचे दागिने दिले होते. मात्र, तरीही तिचा छळ होत असल्याचे महिलेच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तसेच तिच्या हातावर सासरच्यांनीच सर्व गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अनेकांची चौकशी करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी