शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पडक्या इमारतीमध्ये बारबालेवर बलात्कार, पनवेलमधील घटना; एकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 08:45 IST

Crime News: बारमध्ये काम करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील अविनाश चव्हाण या आरोपीला पोलिसांनी पनवेल परिसरातून अटक केली आहे.

नवीन पनवेल : बारमध्ये काम करणाऱ्या वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील अविनाश चव्हाण या आरोपीला पोलिसांनी पनवेल परिसरातून अटक केली आहे.

पीडित तरुणी मूळची उत्तर प्रदेशमधील असून, ती खोपोली येथील एका बारमध्ये काम करते. २९ जानेवारीला तिने मित्रासोबत पनवेलच्या हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर ती रात्री पनवेलजवळील घरी जायला निघाली. यावेळी आरोपी अविनाश व वाकड्या (पूर्ण नाव समजलेले नाही) यांनी तिला रिक्षाने घरी सोडतो, असे सांगितले. त्यानंतर ओरियन मॉलच्या पाठीमागे घेऊन जात तिला शिवीगाळ व दमदाटी केली. पहाटे दोन ते साडेचारच्यासुमारास रेल्वे रुळाच्या पलीकडील नवीन पनवेल येथील जुन्या पडक्या इमारतीच्या गच्चीवर नेऊन दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. 

कोणाला काहीही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच वाकड्या याने नाकावर ठोसा मारून तिला जखमी केले. त्यानंतर दोघेही तिथून पळून गेले. पीडित तरुणीने याची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून अविनाश चव्हाण याला पनवेल परिसरातून अटक केली. दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

अर्धवट तोडकाम का? नवीन पनवेल पंचशीलनगर जवळील जुन्या पडीक इमारतीवर सिडकोच्यावतीने काही वर्षांपूर्वी अर्धवट तोडकामाची कारवाई झाली होती. हे अर्धवट तोडकाम करण्याचे कारण अजून समजलेले नाही. ही इमारत सहा ते सात मजली असून, येथे रात्रीच्या वेळेस अनैतिक धंदे सुरू असतात, अशी माहिती आजूबाजूच्या रहिवाशांनी दिली आहे. येथील अप्रिय घटना बंद करण्यासाठी ही इमारत संपूर्ण जमीनदोस्त करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ