शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: बँक लुटून पळत असलेल्या चोरांची बाईक वाटेत बिघडली, ढकलून नेताना सीसीटीव्हीमध्ये झाले कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 10:57 IST

Crime News: गुजरातमधील बार्डोलीमध्ये दिवसाढवळ्या बँकेची लूट (Bank robbery) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे तीन चोरांनी देशी कट्ट्यांचा धाक दाखवत दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम लांबवली.

सूरत - गुजरातमधील बार्डोलीमध्ये दिवसाढवळ्या बँकेची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे तीन चोरांनी देशी कट्ट्यांचा धाक दाखवत दहा लाख रुपयांपेक्षा अधिकची रोख रक्कम लांबवली. धक्कादायक बाब म्हणजे लूट केल्यानंतर पळून जात असलेल्या तिन्ही चोरांची मोटरसायकल बिघडली. मात्र हे चोर पैशांसह खराब मोटारसायकल घेऊनही फरार झाले. सध्या पोलिसांना या चोरीचा तपास सुरू केला आहे. याशिवाय लुटीच्या एका अन्य घटनेमध्ये चोरट्यांनी सूरतमध्ये एका बिल्डरला लक्ष्य केले.  येथे चोरांनी ९० लाख रुपयांची लूट केली.

सूरत जिल्हा सहकारी बँकेच्या मोटागाव स्थित शाखेमध्ये तीन चोरट्यांनी हा दरोडा टाकला. आसपारच्या परिसरातील शांतता आणि बँकेतील कमी वर्दळ याचा अंदाज घेत हे चोर बँकेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले. सीसीटीव्हीमध्ये हे चोर एका महिला कर्मचाऱ्यासह स्टाफमधील अनेक सदस्यांसोबत मारहाण करताना दिसत आहेत. चोरांच्या हातात देशी कट्टेही होते. या चोरट्यांनी लुटलेल्या रकमेचा आकडा १० लाख ४३ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तीन अज्ञात लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे चोर चेहरा लपवून दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीने येथे आले होते. सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत. मीडिया रीपोर्ट्सनुसार चोरांनी सिक्युरिटी गार्डच्या अनुपस्थित हा दरोडा टाकला आहे.

बँक लुटल्यानंतर बाहेर पडलेले चोरटे १०० मीटर अंतरावर असलेल्या एका घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. सीसीटीव्हीमध्ये दोन चोर खराब बाईकला धक्के मारून नेतानाही दिसत आहेत. तर एक चोर लुटलेली रक्कम पोत्यात भरून घेऊन जाताना दिसत होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरात