शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

Crime News : ‘त्या’ तिन्ही महाठगबाजांची न्यायालयीन कोठडीत रवानगी, कर्जाच्या नावाने लावायचे चुना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 8:44 PM

Crime News : वर्धा जिल्ह्यातील होतकरू तरुणांसह राज्यातील तसेच राज्याबाहेरील इतर जिल्ह्यातील नागरिकांना कर्ज देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना हिंगणघाट पोलिसांनी जेरबंद करून पोलीस कोठडी मिळविली होती.

हिंगणघाट (वर्धा) -  वर्धा जिल्ह्यातील होतकरू तरुणांसह राज्यातील तसेच राज्याबाहेरील इतर जिल्ह्यातील नागरिकांना कर्ज देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना हिंगणघाट पोलिसांनी जेरबंद करून पोलीस कोठडी मिळविली होती. त्यांची पोलीस कोठडी संपत असल्याने या तिन्ही महाठगांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. (All those three swindlers sent to judicial custody)हिंगणघाट परिसरातीलच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रातील हजारो बेरोजगार युवक व युवतींना १० हजार २५० रुपये नगदी घेऊन तुम्हाला कर्ज मंजूर झाल्याचे सांगत पाच लाखाचा बोगस धनादेश देत त्यांची आर्थिक फसवणूक  करणाऱ्या या टोळीचा हिंगणघाट येथील डाव फसला. कुठलीही परवानगी न घेता कर्ज मेळाव्याच्या नावाखाली नागरिकांची गर्दी झाल्यावर ५ मार्चला हिंगणघाट पोलिसांनी वेळच दखल घेत हा फसवणुकीचा डाव हाणून पाडला होता. त्यावेळी कंपनीच्या स्थानिक संचालक प्रमोदीनी आस्कर यांना गजाआड करण्यात आले होते.पोलीस चौकशीसाठी सुरुवातीला न्यायालयाने तिची १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. तर नंतर १५ मार्चपर्यंत  पीसीआरमध्ये न्यायालयाने वाढ केली होती. आस्कर ही पोलीस पोलीस कोठडीत असतानाच १० मार्चला फसवणूक करणाऱ्या टोळीचा प्रमुख सुत्रधार आशीष डे याला कोलकाता विमानतळावरुन व बनावट धनादेशांसह तसेच ईएमआय कार्ड छापणारा सिमांचल पांडा याला मुंबईहुन अटक करण्यात आली. या दोघांनाही न्यायालयाने १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली होती. या तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद लक्षात घेवून न्यायालयाने तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.आर्थिक फसणूक प्रकरणातील तिन्ही आरोपींची पोलीस कोठडी संपत असल्याने सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.- संपत चव्हाण, ठाणेदार, हिंगणघाट.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी