शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

बापरे! अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नावाने लाखोंची फसवणूक; जाणून घ्या, काय आहे 'हे' प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 17:00 IST

Crime News : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Actor Sushant Singh Rajput) नावाने लाखोंची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - नोएडामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Actor Sushant Singh Rajput) नावाने लाखोंची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता सुशांतच्या मृत्यूवर चित्रपट बनवण्याच्या बहाण्याने तब्बल  8 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी हॉटेलच्या मालकाने नोएडा सेक्टर 39 पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडाच्या सेक्टर-39 मधील हे प्रकरण आहे. जिथे काही लोकांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या नावावर चित्रपट बनवण्याच्या नावाखाली हॉटेल बुक केलं आणि जवळपास एक वर्ष ते त्याच हॉटेलमध्ये राहिले. मात्र भाडं देताना त्यांनी हॉटेल मालकाची फसवणूक केली. नंतर त्यांनी चेक दिला पण तो बाऊन्स झाला. या प्रकरणी हॉटेलच्या मालकाने नोएडा सेक्टर 39 पोलीस स्टेशनमध्ये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे, 

नोएडा सेक्टर 39 पोलीस स्टेशनचे प्रभारी राजीव बालियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण खूप जुनं आहे, मात्र आता 3 जून रोजी हॉटेल मालक मंगलम तिवारी यांनी याबाबत तक्रार केली आहे. हॉटेल मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार केली की 2020 मध्ये त्याच्या हॉटेलमध्ये 4 लोक आले. विजय शेखर, नितीन पंत, सचिन तिवारी आणि वरुण खंडेलवाल अशी त्या चौघांची नावं आहेत. त्यांनी हॉटेलमध्ये सांगितलं की ते सर्व डायरेक्टर आहेत आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह यांच्या मृत्यूवर ते मिळून चित्रपट बनवणार आहेत. 

सचिन तिवारी नावाची व्यक्ती या चित्रपटात अभिनेत्याची भूमिका साकारणार होता. त्यानंतर ते हॉटेलमध्ये राहू लागले. त्या चौघांनी चार रुम बुक केल्या होत्या. ते लोक जवळपास एक वर्ष हॉटेलमध्ये राहिले पण त्यांनी त्याचे भाडे भरले नाही. या घटनेनंतर मालकाने या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली, त्यावर न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCrime Newsगुन्हेगारी