शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येने खळबळ; कागदावर तब्बल 200 वेळा लिहिलं 'आशिष LOVE वैशाली'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 20:31 IST

Crime News : डॉक्टर तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. मात्र आत्महत्येआधी तिने एका कागदावर तब्बल 200 वेळा 'आशिष LOVE वैशाली' असं लिहिलं होतं. 

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये एका मेडिकल विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. डॉक्टर तरुणीने टोकाचा निर्णय घेतल्याने सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. मात्र आत्महत्येआधी तिने एका कागदावर तब्बल 200 वेळा 'आशिष LOVE वैशाली' असं लिहिलं होतं. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुरादाबादमधील तीर्थंकर महावीर विद्यापीठातील मेडिकल विद्यार्थिनी डॉ. वैशाली चौधरी हिने तिच्या हॉस्टेल रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर पोलिसांना तिच्या खोलीत एक कागद सापडला. या कागदावर जवळपास 200 वेळा "आशिष लव्ह वैशाली" असं लिहिलं होतं. त्यावरून पोलिसांनी आशिषचा शोध घेतला असता त्यांना वैशालीच्या प्रेमप्रकरणाचा शोध लागला. डॉ. आशिष जाखड आणि वैशाली हे एमबीबीएसचं एकत्र शिक्षण घेत होते. या काळात त्यांचं एकमेकांवर प्रेम जडलं. दोघांनी एकमेकांशी लग्न कऱण्याचाही निर्णय घेतला.

आत्महत्या करून जीवन संपवलं

MBBS पूर्ण झाल्यानंतर मात्र डॉ. आशिष दिल्लीला निघून गेला. दिल्लीला गेल्यानंतर आशिष आपलं वचन विसरला, अशी वैशालीची तक्रार होती. या मुद्द्यावरून ती अनेकदा आशिषला भेटायचा प्रयत्न करत होती, मात्र आशिष ते टाळत असल्याचं सांगितलं जातं. यामुळे ती काही काळ तणावात देखील होती. यातूनच तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येच्या आदल्या रात्री वैशाली हॉस्टेलमध्ये आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी रूमवर आल्यानंतर तिने गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं.

समर्थ जोहरी या आणखी एका डॉक्टरचंही नाव

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. डॉ. आशिष जाखडचे वडील हे CRPF मध्ये इंस्पेक्टर होते.  या आत्महत्या प्रकरणात समर्थ जौहरी या आणखी एका डॉक्टरचंही नाव आलं आहे. डॉ. समर्थ हा वैशाली आणि आशिष यांचा मित्र असल्याचं समजतं आहे. आशिष आणि समर्थ यांनीच असं काहीतरी केलं, ज्यामुळे आपली मुलगी बेचैन होती, असा दावा वैशालीच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे त्या दिशेने देखील पोलिसांना चौकशी सुरू केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस