शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

600 चोऱ्या, सात खुनांचे पाप, गुन्ह्याआधी करायचा कालीमातेचा जाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 14:10 IST

तब्बल 600 चोऱ्या आणि सात खुनांप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या एका कुख्यात गुन्हेरागाला पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या.

फरीदाबाद -  तब्बल 600 चोऱ्या आणि सात खुनांप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या एका कुख्यात गुन्हेरागाला हरियाणा पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. अटक आरोपी जगतार हा जगतार गँगचा म्होरक्या आहे. तो चोरी आणि लुटमारीतून मिळालेली रक्कम अय्याशीसाठी उडवत असल्याचे तसेच गुन्हा करण्याआधी कालीमातेचा जप करत असल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. गुन्हेगारी आणि अय्याशी जीवन जगणारा जगतार रात्र दिल्लीतील रेड लाइट एरिया किंवा फऱीदाबादमधील कुठल्यातरी हॉटेलमध्ये घालवत असे, तर दिवसा मुसेसर भागातील फुटपाथ किंवा निवाऱ्यांमध्ये घालवत असे. विशेष म्हणजे जगतारने कधीही स्वत:साठी भाड्याने घर घेतले नाही, तसेच तो मोबाइलही वापरत नसे. जर कुणाशी संपर्क साधायचा झाल्यास तो सहकाऱ्यांचा मोबाइल वापरत असे. 42 वर्षीय जगतार हा अविवाहित असून, केवळ तिसरीपर्यंत शिकलेला आहे. 2005 साली त्याच्या नावावर पहिला गुन्हा दाखल झाल्याची नोंद आहे. त्यानंतर अटक होईपर्यंत त्याच्यावर सात हत्या आणि 600 हून अधिक चोऱ्या आणि लुटमारी प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्याला याआधीही अनेकदा अटक झाली होती. मात्र त्यावेळी तो सुटला. पोलिसी रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असलेला जगतारचा तंत्र-मंत्रावर विश्वास आहे. हत्या, लुटालूट, चोरी असे गुन्हे करण्यापूर्वी तो काली मातेच जप करत असे. त्याला असे करण्याचा सल्ला एका तांत्रिकाने दिला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिस