शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: निर्जनस्थळी आढळला कारसह जळालेला मृतदेह, इगतपुरी तालुक्यातील घटना,अपघात की घातपात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2022 06:26 IST

Crime News: इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेवाडी शिवारात सोमवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात कार जळाली असून त्यामध्ये एक व्यक्तीही पूर्णपणे जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली आहे.

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेवाडी शिवारात सोमवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास एक अज्ञात कार जळाली असून त्यामध्ये एक व्यक्तीही पूर्णपणे जळलेल्या अवस्थेमध्ये आढळून आली आहे. मंगळवारी सकाळी घोटी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जळालेली कार ही बिनानंबरची असून, त्यांतील एक व्यक्ती जळून खाक झाली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे . ही घातपाताची घटना आहे की अपघात याबाबत सर्वत्र चर्चा सुरू असून जळालेली व्यक्ती कोण, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

इगतपुरी तालुक्यातील निसर्गरम्य परिसर असलेल्या भावली धरणाच्या परिसरात आंबेवाडीच्या दोन किलोमीटर अलीकडे रस्त्यावर एक कार मंगळवारी जळालेल्या अवस्थेत मिळाली. त्यात एक व्यक्ती पूर्णपणे जळून गेलेली असल्याचेही आढळून आले. जळालेला मृतदेह पुरुषाचा की स्त्रीचा याबाबत परिसरामध्ये चर्चा सुरू आहे. पोलिसांनी हा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला असून, फॉरेन्सिक लॅबच्या माध्यमातून तो कोणाचा, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

दि. २९ च्या मध्यरात्री आंबेवाडी शिवारात एका निर्जनस्थळी ही घटना घडली. यामध्ये सदरची कार पूर्णपणे जळून गेली असून त्यामध्ये कोळसा झालेला एक मृतदेहही आढळून आला. याबाबत सकाळीच घोटी पोलिसांना खबर देण्यात आली. त्यानंतर लगेचच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले व त्याने पंचनामा केला. या कारमधील जळालेला मृतदेह कोणाचा आहे, याची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

याबाबत घोटी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप खेडकर उपनिरीक्षक संजय कवडे यांच्यासह पोलीस पथकाने परिसरात सदर घटनेबाबत चौकशी केली. मात्र कोणताही सुगावा मिळू शकला नाही. या जागेवरील परिस्थिती पाहता, ही घटना घातपाताची असल्याचा कयास वर्तविला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण इगतपुरी तालुका हादरला आहे. घटनेच्या तपासासाठी यंत्रणा गतिमान झाली आहे.

डॉ. वाजे प्रकरणाची झाली आठवणदि. २६ जानेवारी रोजी इगतपुरी तालुक्यातील घोटी शिवारामध्ये एका जळालेल्या कारमध्ये मानवी मृतदेह संपूर्ण कोळसा झालेल्या स्थितीमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी याबाबतचा तपास केल्यानंतर ही कार आणि त्यामधील मृतदेह हा नाशिक महापालिकेच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेच्या ए्क दिवस आधीच त्यांच्या पतीने त्या बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. फॉरेन्सिक रिपोर्टमधून हा मृतदेह डॉ. वाजे यांचा असल्याचे स्पष्ट झाले होते. कालांतराने त्यांच्या पतीनेच खून करून डॉ. वाजे यांचा मृतदेह कारसह जाळून टाकल्याचे समोर आले. या घटनेमध्येही काहीसा असाच प्रकार असल्याने नागरिकांना डॉ. वाजे प्रकरणाची आठवण झाली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिक