शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! आईचा 'तो' संशय खरा ठरला, मुलाने पाठलाग करून वडिलांच्या प्रेमप्रकरणाचा भांडाफोड केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 11:26 IST

Crime News : मुलाने आपल्या वडिलांचा तब्बल 800 किलोमीटर पाठलाग करून त्यांच्या प्रेमप्रकरणाची पोलखोल केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका मुलाने आपल्या वडिलांचा तब्बल 800 किलोमीटर पाठलाग करून त्यांच्या प्रेमप्रकरणाची पोलखोल केल्याची घटना समोर आली आहे. उज्जैनमध्ये प्रेयसीसोबत असलेल्या वडिलांना त्यांच्या मुलाने रंगेहाथ पकडलं आणि एकच गोंधळ झाला. या घटनेनंतर वडील ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथून त्यांना बाहेर काढण्यात आलं. खूप वेळ लोकांना फॅमिली ड्रामा पाहायला मिळाला. मुलाने आपल्या वडिलांचा एक व्हिडीओ देखील काढला असून सध्या तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांना रंगेहाथ पकडण्यासाठी मुलगा ग्वाल्हेरवरून जयपूर आणि जयपूरवरून उज्जैनपर्यंत पोहोचला होता. 62 वर्षीय आलोक चौधरी हे एका खासगी कंपनीत काम करतात. त्याचं एका 59 वर्षीय महिलेसोबत अफेअर होतं. फेसबुकवर या दोघांची मैत्री झाली होती. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आलोक चौधरी यांच्या पत्नीला पतीच्या प्रेमप्रकरणाचा संशय आला होता. तिने मुलाला वडिलांवर लक्ष ठेवायला सांगितलं. वडील कामानिमित्त बाहेर जाणार असल्याचं समजल्यानंतर पत्नीला आणखी संशय आला आणि तिने आपल्या मुलाला त्यांचा पाठलाग करायला सांगितलं. 

मुलाने दोघांना रंगेहाथ पकडलं

मुलानं दिलेल्या माहितीनुसार त्याचे वडील अगोदर जयपूरला गेले. जयपूरवरून त्यांनी ट्रेन पकडली आणि प्रेयसीला घेऊन ते उज्जैनला गेले. उज्जैनमधील महाकाल मंदिरासमोरच्या हॉटेलमध्ये त्यांनी एक रुम बुक केली आणि तिथं एकत्र राहू लागले. त्यानंतर मुलानं दोघांना रंगेहाथ पकडलं. वडिलांचं प्रेमप्रकरण असल्याचा आईला संशय होता. आपल्या आईसाठी आपण हे काम केल्याचं त्यानं सांगितलं. या वयात वडिलांचं प्रेमप्रकरण समोर आल्यामुळे धक्का बसल्याचं त्यानं म्हटलं आहे. 

व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल

जेव्हा आपल्याला पहिल्यांदा याबाबत समजलं, तेव्हा आपला विश्वास बसत नव्हता. मात्र आईच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण वडिलांचा पाठलाग सुरू केल्याचं मुलाने सांगितलं. आलोक चौधरी हे पत्नीवरच संशय घ्यायचे आणि घटस्फोटासाठी दबाव टाकत होते. याच दरम्यान त्यांची एका महिलेसोबत ओळख झाली आणि प्रेमप्रकरण सुरू झाल्याची माहिती मुलांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी