शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! प्रॅक्टिकलच्या बहाण्याने थांबवलं; गुंगीचं औषध देत 17 मुलींचं लैंगिक शोषण केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 16:57 IST

Crime News : दहावीत असलेल्या 17 विद्यार्थिनींना प्रॅक्टिकल परीक्षेचा बहाणा करत शाळेतच थांबण्यास सांगितलं. यानंतर त्याने त्यांच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळलं आणि सहकाऱ्यासोबत मिळून लैंगिक शोषण केलं आहे.  

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये गुंगीचं औषध देत 17 मुलींचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने परीक्षेच्या बहाण्याने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुख्याध्यापकाने दहावीत असलेल्या 17 विद्यार्थिनींना प्रॅक्टिकल परीक्षेचा बहाणा करत शाळेतच थांबण्यास सांगितलं. यानंतर त्याने त्यांच्या जेवणात गुंगीचं औषध मिसळलं आणि सहकाऱ्यासोबत मिळून लैंगिक शोषण केलं आहे.  

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन विद्यार्थिनीच्या पालकांनी स्थानिक आमदार प्रमोद उत्तवाल यांच्याकडे मदत मागितली असता त्यांनी वरिष्ठ पोलीस अधीक्षक अभिषेक यादव यांच्याशी संपर्क साधत चौकशी करण्यास सांगितलं. तोपर्यंत मुलींच्या कुटुंबाने वारंवार पोलीस तक्रार दाखल करण्याचे प्रयत्न केले होते. पण त्यांना मदत मिळत नव्हती असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.

मुख्याध्यापकाने परीक्षेच्या बहाण्याने केला विद्यार्थिनींचा विनयभंग

तक्रारदार मुलीने दिलेल्या माहितीनुसार, "मुख्याध्यापक योगेश यांनी प्रॅक्टिरल परीक्षेच्या बहाण्याने आम्हा 16 ते 17 मुलींना बोलावून घेतलं. आम्हाला लिहायचं असल्याचं सांगत रात्री शाळेतच थांबण्यास सांगण्यात आलं. दुसऱ्या दिवशी अजून प्रॅक्टिकल असतील असं सांगण्यात आलं. यावेळी मुलींनी खिचडी बनवली असता ती नीट शिजली नसल्याचं मुख्याध्यापक म्हणाले. यानंतर त्यांनी स्वत: बनवली आणि आम्हाला खायला दिली. खिचडी खाताच आम्ही बेशुद्ध पडलो आणि त्यानंतर आमचा विनयभंग करण्यात आला."

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं तयार 

पोलिसांनी याप्रकरणी शाळेचा मुख्याध्यापक जिथे विद्यार्थिनी शिकतात आणि प्रॅक्टिकल परीक्षेच्या बहाण्याने ज्या शाळेत नेलं त्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला. यामधील एकाला अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथकं तयार करण्यात आली आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करुन न घेणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी