शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! वडिलांचं डायलिसिस करायला गेलेल्या मुलीवर रुग्णालयात बलात्कार; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 13:53 IST

Crime News : वडिलांचं डायलिसिस करायला गेलेल्या मुलीवर रुग्णालयातच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली - देशात महिलांवरील अत्याचाराच्या, बलात्काराच्या घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. वडिलांचं डायलिसिस करायला गेलेल्या मुलीवर रुग्णालयातच बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये आपल्या वडिलांचं डायलिसिस करण्यासाठी एक 14 वर्षीय मुलगी रुग्णालयात आली होती. त्यावेळी रुग्णालयात हाऊसकिपिंगचं काम करणाऱ्या एका व्यक्तीने मुलीला गाठलं आणि तिच्यावर बलात्कार केला . 

आरोपीने काहीतरी खोटं कारण सांगून मुलीला रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये नेलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरीदाबादच्या सेक्टर 16 मध्ये असलेल्या एका रुग्णालयात हा भयंकर प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. रुग्णालयात तो हाऊसकिपिंगचं काम करतो. 21 ऑगस्ट रोजी 14 वर्षीय मुलगी वडिलांच्या डायलिसिससाठी रुग्णालयामध्ये गेली होती. त्यावेळी वडिलांचं डायलिसिस सुरू असताना मुलगी बाथरुममध्ये गेली. तेथून बाहेर आल्यावर तिथेच आरोपी उभा होता. त्याने काहीतरी कारण सांगून तिला बेसमेंटमध्ये नेलं. 

रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नराधमाने तेथून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात येत आहे. रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कुटुंबीयांनी लग्नाला परवानगी द्यावी म्हणून एका कपलने भयंकर पाऊल उचललं आहे. बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच अ‍ॅसिड अटॅक केला आहे. ज्यानंतर घरच्यांनी तिचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावून दिलं. 

प्रेमासाठी काय पण! बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंडने स्वत:वरच केला अ‍ॅसिड अटॅक अन्...

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तरुणीसह पाच आरोपींनी अटक केली आहे. 48 तासांच्या आतमध्ये त्यांनी या प्रकरणाची पोलखोल केली. डीएसपी शिब्ली नोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं साजन कुमार नावाच्या तरुणासोबत गेल्या सात वर्षांपासून प्रेमप्रकरण होतं. मात्र तरुणीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी मिळून हा मोठा निर्णय घेतला. तसेच अ‍ॅसिड अटॅक करून शरीराच्या काही भागाला इजा पोहचवण्याचं ठरवलं. असं केल्यानंतर तरुणीच्या घरचे लग्नाला तयार होतील असं त्यांना वाटलं. म्हणूनच 18 ऑगस्टला साजनने आपल्या तीन भावांसह हे कृत्य केलं. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा साजन आणि तरुणी एकत्रच फिरत होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस