शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! महिलेचं अपहरण करून 14 जणांनी केला सामूहिक बलात्कार; पोलीस येताच कपडे न घालता पळाले नराधम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 11:35 IST

Crime News : पीडित महिलेची अवस्था सध्या अत्यंत गंभीर आहे. महिलेला गयाच्या मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

नवी दिल्ली - बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका 32 वर्षीय महिलेवर 14 जणांनी सामूहिक बलात्कार (Gang Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या नराधमांनी आधी महिलेचं अपहरण केलं आणि यानंतर तिला नदीच्या किनाऱ्यावर घेऊन गेले. महिलेवर सामूहिक बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच जेव्हा पोलीस (Police) घटनास्थळी पोहचले तेव्हा आरोपींनी आपले कपडे तिथेच सोडले आणि नग्नावस्थेतच ते पळत सुटले. आरोपींनी आपल्या चपलाही तिथेच सोडल्या. बिहारच्या गयामध्ये ही घटना घटना घडली आहे. 

पीडित महिलेची अवस्था सध्या अत्यंत गंभीर आहे. महिलेला गयाच्या मगध मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना फस्सिल पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील आहे. दोन तरुण महिलेला उचलून आपल्या गाडीवरून फल्गु नदीवर घेऊन गेले. याचठिकाणी आरोपींनी महिलेवर बलात्कार केला. काही वेळानंतर 5 बाईकवर बसून आणखी 12 जण याठिकाणी आले. या सर्वांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. जेव्हा पीडितेने याचा विरोध केला तेव्हा आरोपींनी तिला जबर मारहाण केली.

सुरुवातीला जेव्हा तरुण महिलेला घेऊन नदीच्या काठावर आले तेव्हा आसपासच्या गावातील लोकांनी त्यांना पाहिलं. मात्र, अंधार असल्याने कोणाला काहीच समजलं नाही. काही वेळानंतर जेव्हा बाईकवरून 12 जण नदीकडे जाताना दिसले तेव्हा गावातील लोकांना शंका आली. यानंतर गावातील काही लोकांनी नदीच्या कडेला जाऊन पाहिल्यानंतर त्यांना या घटनेबद्दल समजलं. यानंतर गावातील लोकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना सुरुवातीला काहीच समजलं नाही. 

पोलिसांची नजर नंतर बाईकवर गेली आणि यानंतर नदीत उड्या घेत पोलीस मध्यभागी असलेल्या बेटावर पोहोचले. पोलिसांना येताना पाहून आरोपी कपडे न घालताच नग्नावस्थेत पळत सुटले. पोलिसांनी आरोपींचे कपडे आणि चपला ताब्यात घेतल्या आहेत. तर, महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेची अवस्था गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस