Crime of molestation registered on Ripai district president | रिपाइं जिल्हाध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

रिपाइं जिल्हाध्यक्षावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

मीरा राेड : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट)चे मीरा भार्इंदर जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर यांच्यावर  काशिमीरा पोलीस ठाण्यात शुक्रवारी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित महिलेच्या फिर्यादीत अन्य दोन घटनांत एकावर बलात्कार व तिघांवर दमदाटी, शिवीगाळ केल्याचा गुन्हाही दाखल केला आहे.

पीडित महिला काशिमीरा पोलीस ठाण्यासमोर धरणे देऊन बसली होती. तिची फिर्याद पोलिसांनी नोंदवून घेतली.  शेलेकर यांनी फेब्रुवारी २०१६ मध्ये त्यांच्या कार्यालयात सदर महिलेचा विनयभंग केला तर कृष्णा कांबळे याने काशिमीरा नाका येथे जुलै २०१८ मध्ये त्याच्या गाडीत महिलेस शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे. तसेच घोडबंदर शिफ्टिंग येथे सदर महिलेस अजय सिंह, विशाल व संजय यांनी दमदाटी व शिवीगाळ केली, असेही तक्रारीत नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

English summary :
Crime of molestation registered on Ripai district president

Web Title: Crime of molestation registered on Ripai district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.