शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! घरात गाढ झोपेत होता तरूण, काही लोक आले अन् त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून फरार झाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 12:32 IST

पीडित तरूणाचं नाव कमलेश आहे. त्याच्यावर लखनौमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याची तब्येत नाजूक असल्याची माहिती आहे.

उत्तर प्रदेशच्या उन्नावमद्ये रविवारी सायंकाळी धारदार शस्त्रास्त्रे असलेल्या अज्ञात गुन्हेगारांनी एका तरूणाच्या घरात शिरत कथितपणे त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. पोलिसांनुसार, गौरी गावात अज्ञात लोक एका घरात जबरदस्ती घुसले आणि घरातील तरूणाला त्यांनी बंदी बनवलं. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला.

पीडित तरूणाचं नाव कमलेश आहे. त्याच्यावर लखनौमधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत आणि त्याची तब्येत नाजूक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी अज्ञात गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे. 

अतिरिक्त पोलीस अधिक्षक शशी शेखर सिंह म्हणाले की, आम्ही गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी एक डॉग स्क्वॉड कामाला लावलं आहे. या कृत्यामागे असलेल्या गुन्हेगारांबाबत आम्ही लोकांनाही विचारत आहे. गुन्हेगारांना लवकरच अटक केली जाईल. पोलीस म्हणाले की, या कृत्यामागे किती गुन्हेगार होते हे अजून समजू शकलेलं नाही. आम्ही पीडित तरूणाचा जबाब घेऊ शकलो नाहीत. तो बरा झाला की, त्याचा जबाब घेतला जाईल.

चौकशी दरम्यान समोर आलं की, काही लोक शस्त्रास्त्र घेऊन कमलेशच्या घरात जबरदस्ती घुसले होते. हल्लेखोरांनी आधी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. घटना घडली तेव्हा कमलेश घराच्या व्हरांड्यात झोपला होता. जेव्हा कमलेशने मदतीसाठी आवाज दिला तेव्हा गुन्हेगार अंधाराचा फायदा घेत फरार झाले. परिवारातील सदस्यांनी हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण ते फरार झाले.

हल्लेखोरांनी हा हल्ला का केला? त्यांनी कमलेशचा प्रायव्हेट पार्ट का कापला? याबाबतचचं कोणतंही कारण अजून समोर आलेलं नाही. पोलीस वेगवेगळ्या प्रकारे या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या काही टीम गुन्हेगारांच्या शोधासाठी पाठवण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी