पिंपरी : मित्रांनी पतीला बाहेर नेले. त्याला भरपूर दारू पाजून मानसिक व शारीरिक त्रास दिला. यामुळे पतीने आत्महत्या केली. अशी फिर्याद आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या पत्नीने सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना विशालनगर येथील चौंधे लॉन्स येथे घडली. चेतराज विश्वकर्मा (रा. पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या पत्नी विष्ना चेतराज विश्वकर्मा (वय २५) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गोपी परिवार, अमर परिवार, जयराम जयगडी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यांनी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास मयत चेतराज यांना विशालनगर येथील चौंधे लॉन्स येथे नेले. तिथे नदीच्या पुलावर बसवून त्यांना भरपूर दारू पाजली. दारू पाजल्यानंतर चेतराज यांना मानसिक व शारीरिक त्रास दिला. यामुळे चेतराज यांनी आत्महत्या केली. असे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी चेतराज यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा सांगवी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.
दारू पाजून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 17:11 IST