शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 45 दिवसांचा संसार झाला उद्ध्वस्त! पत्नीने Video Call वर कापली नस; पतीनेही संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 16:08 IST

Crime News : एक जोडप्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान लखनऊमध्ये एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या 45 दिवसांत संसार उद्ध्वस्त झाला आहे. एक जोडप्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. पत्नीने व्हिडीओ कॉलवर हाताची नस कापली तर त्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाचं 45 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं आणि फोनवर वाद झाला असता पत्नीने हाताची नस कापून घेतली. त्यानंतर पतीने देखील आत्महत्या करुन आपलं आयुष्य संपवलं आहे.

लखनऊमधील परसादी खेडा, पारा येथे राहणाऱ्या विवेक प्रसादचे 29 नोव्हेंबर रोजी डूडा कॉलनीत राहणाऱ्या रितूसोबत लग्न झालं होतं. विवेकचे वडील गोकर्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो शुक्रवारी सकाळी ड्युटीवर गेला होता आणि त्यांची (गोकर्ण यांची पत्नी) पत्नी संगीता घरी होती. संगीता गच्चीवर बसल्या होत्या. 2 जानेवारी रोजी सून रितू तिच्या मामाच्या घरी गेली होती आणि तेव्हापासून ती तिथेच राहत होती.

वडिलांनी सांगितलं की, रितूने शुक्रवारी दुपारी विवेकला फोन केला होता आणि त्यावेळी दोघांमध्ये काही गोष्टीवरून वाद झाला. यानंतर रितूने ब्लेडने तिच्या हाताची नस कापली आणि विवेकला व्हिडीओ कॉल केला. दुसरीकडे व्हिडीओ कॉलवर पत्नीची अवस्था पाहून विवेक अस्वस्थ झाला आणि तो आपल्या खोलीत गेला. जिथे त्याने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.

विवेकनं गळफास लावून आत्महत्या केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. विवेकची आई गच्चीवरून खाली आल्यावर घरच्यांना हा प्रकार कळला. त्यांना खोलीत मुलगा लटकलेला अवस्थेत दिसला आणि त्यानंतर त्यांनी लोकांना बोलावलं. नातेवाईकांनी स्थानिक लोकांच्या मदतीने विवेकचा मृतदेह खाली उतरवून लोकबंधू रुग्णालयात नेला. मात्र डॉक्टरांनी विवेकला रुग्णालयात मृत घोषित केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न