शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातमधून विक्रीसाठी आणलेली पाऊणे नऊ लाखांची दारू जप्त; भिवंडी गुन्हे शाखेची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 21:49 IST

गुजरात येथून मक्का पोहे घेऊन आलेल्या टेम्पोतुन दमण बनावटीची दारू विक्री करीता घेऊन आलेल्या टेम्पोवर अंजुरफाटा मनीसुरत कंपाऊंड येथे कारवाई करीत ८ लाख ७४ हजार २०० रुपयांची इंग्लिश दारूसह ट्रक जप्त केला आहे.

नितिन पंडीत

भिवंडी- 

गुजरात येथून मक्का पोहे घेऊन आलेल्या टेम्पोतुन दमण बनावटीची दारू विक्री करीता घेऊन आलेल्या टेम्पोवर अंजुरफाटा मनीसुरत कंपाऊंड येथे कारवाई करीत ८ लाख ७४ हजार २०० रुपयांची इंग्लिश दारूसह ट्रक जप्त केला आहे. सदरची कारवाई भिवंडी गुन्हे शाखा व राज्य उत्पादन शुल्क विभाग भिवंडी यांच्या संयुक्त पथकाने केली असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी शुक्रवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

भिवंडी गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार लक्ष्मण व्हदलुरे,नरसिंग क्षीरसागर यांना गुप्त बातमीदारा मार्फत गुजरात येथून मक्का पोहे  हे बॉक्स घेऊन निघालेल्या टेम्पो मधून दमण येथे विक्रीसाठी बनविलेली इंग्लिश दारू तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली असता.त्यांनी सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शना खाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मोरे, प्रफुल्ल जाधव,पो उपनिरी रमेश शिंगे, पथकातील रामसिंग चव्हाण,हनुमंत वाघमारे,रवींद्र पाटील, जानुसिंग पवार, राजेंद्र चौधरी, रामचंद्र जाधव, मंगेश शिर्के, अरुण पाटील, सुनील साळुंखे,सचिन जाधव,साबीर शेख, रंगनाथ पाटील, भावेश घरत, रोशन जाधव, प्रशांत बर्वे, रवींद्र साळुंखे व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मनोज निकम, शिपाई संजय तडवी, संजय भोसले या संयुक्त पथकाने भिवंडी शहरालगतच्या राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील मनीसुरत कंपाऊंड येथे पाळत ठेवून त्या ठिकाणी आलेल्या टेम्पोची टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये मक्का पोहेच्या बॉक्स मागे दमण बनावटीच्या मकडॉल, डीएसपी, ब्लेंडर, रॉयल चॅलेंज, रॉयल स्टेक, डीएसपी ब्लॅक,एमपायर ब्ल्यू या ब्रँड च्या दारूच्या १९४४ बाटल्या असलेले १०२ बॉक्स आढळून आले. 

पोलिसांनी सदर ८ लाख ७४ हजार २०० रुपयांची विक्री साठी अवैधरित्या आणलेली इंग्लिश दारू व ट्रक असा एकूण १६ लाख ८२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करीत रब्बी अहमद मोहम्मद रफी शेख व अविनाश अर्जुन घाडीगांवकर दोघे रा. मुंबई यांना अटक करीत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी