शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकल्याने गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 23:15 IST

Crime News : घणसोली सेक्टर १६ येथे राहणाऱ्या संजय सिंग (२५) या रिक्षाचालकाच्या घरावर शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. सिंग हा घरात एकटाच असताना, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याला दरवाजा वाजल्याचा आवाज आला. 

नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून पिस्तुलीच्या धाकावर दरोडा टाकल्याची घटना घणसोलीत घडली आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दरोडा टाकणाऱ्यांपैकी एक जण तक्रारदाराच्या ओळखीचा असून, यापूर्वी त्याला उसने पैसेही दिले होते.घणसोली सेक्टर १६ येथे राहणाऱ्या संजय सिंग (२५) या रिक्षाचालकाच्या घरावर शुक्रवारी पहाटे सशस्त्र दरोडा पडला. सिंग हा घरात एकटाच असताना, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास त्याला दरवाजा वाजल्याचा आवाज आला. यामुळे त्याने दरवाजा उघडला असता, समोर उभ्या असलेल्या व्यक्तीने पिस्तुलीचा धाक दाखवत घरात प्रवेश मिळवला. यावेळी सिंग याच्या जुन्या ओळखीतला सागर ढोणे हाही सोबत होता. दोघांनी घरात प्रवेश करून पिस्तुलीचा धाक दाखवत, कपाटातील २० हजार रुपयांची रोकड, मोबाइल, तसेच संगणक चोरून नेला, तसेच घडलेल्या घटनेची पोलिसांकडे तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. दरम्यान, दोघे जण घरात घुसले असता, त्यांचा तिसरा साथीदार टेरेसवरून पाळत ठेवत होता. या जबरी लुटीनंतर त्यांनी सिंग याला घरात कोंडून बाहेरून कडी लावून पळ काढला. सिंग याने सागर ढोणे याला दोन वर्षांपूर्वी १५ हजार रुपये उसने दिले होते. मात्र, ही रक्कम परत मागितली असता, तो धमकावत होता. याच रागातून त्याने दोन साथीदारांसह घरी दरोडा टाकला असल्याची शक्यता सिंग याने वर्तविली आहे. त्यानुसार, रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबई