भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीपासून विभक्त झालेली त्याची पत्नी हसीन जहां आणि तिच्या पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी अर्शी जहां यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हसीन जहांचा एका महिलेसोबत जमिनीच्या वादावरून भांडतानाचा एक व्हडिओ देखील समोर आला आहे. सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील सुरी येथील आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी हसीन जहाँचे तिच्या शेजाऱ्यांसोबत जमिनीच्या वादावरून भांडण झाले होते. हे प्रकरण सुरी नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ५ अंतर्गत येणाऱ्या सोनटोर भागातील आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, ही जमीन कथितपणे अर्शी जहाँची आहे. यांनी आपोर केल आहे की, गुड्डू बीबी त्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे.
हसीन जहांच्या भांडणाचा व्हिडिओ - मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहाँ तिच्या शेजाऱ्याशी भांडतानाचा एक व्हिडिओ एनसीएम इंडिया कौन्सिल फॉर मॅन अफेयर्स नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. याच बरोबर, हसीन जहाँ आणि तिच्या पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी अर्शी जहाँ यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम १२६ (२), ११५ (२), ११७ (२), १०९, ३५१ (३) आणि ३ (५) अंतर्गत हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा दावा ही या पोस्टमध्ये करण्यात आला आहे.
हसीन जहाँने सुरीच्या वॉर्ड क्रमांक ५ मध्ये एका वादग्रस्त जागेवर बांधकाम सुरू केले असता हा वाद सुरू झाला, संबंधित जागा कथितपणे तिची मुलगी अर्शी जहाँच्या नावावर आहे. बांधकाम थांबवण्याचा प्रयत्न केला असता हसीन आणि तिच्या मुलीने दलिया खातूनवर हल्ला केल्याचा आरोप आहे.