कोविड काळातही अधिकाऱ्यांची वसुली जोमात; ६०० लाचखोरांना अटक, २०० दिवसांत कोट्यवधी उकळले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 07:48 AM2021-07-28T07:48:31+5:302021-07-28T07:49:46+5:30

गतवर्षी याच कालावधीत ३३१ ट्रॅपमध्ये ४६२ आरोपी होते. यंदा त्यात १०४ वाढीव ट्रॅपची भर पडली. म्हणजेच कोरोनाकाळातही लाचखोर सुसाट सुटल्याचे संतापजनक चित्र आहे.

In Covid period, 600 bribe takers arrested, Taking more than 1 crores bribe in 200 days | कोविड काळातही अधिकाऱ्यांची वसुली जोमात; ६०० लाचखोरांना अटक, २०० दिवसांत कोट्यवधी उकळले

कोविड काळातही अधिकाऱ्यांची वसुली जोमात; ६०० लाचखोरांना अटक, २०० दिवसांत कोट्यवधी उकळले

Next
ठळक मुद्देयंदाच्या पहिल्या २०० दिवसांत एसीबीने जे ४३५ ट्रॅप यशस्वी केले, त्यात ६०० लाचखोरांना अटक करण्यात आली.सर्वाधिक लाचखोर क्लास थ्री कर्मचारी आहेत.४० क्लास वन अधिकारीही सापडले जाळ्यात

प्रदीप भाकरे

अमरावती : यंदा जानेवारी ते १९ जुलै या २०० दिवसांच्या कालावधीत राज्यातील ६०० लाचखोरांनी तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच उकळली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या कालावधीत ४३५ ट्रॅप यशस्वी केले. गतवर्षीच्या पहिल्या सहामाहीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सहामाहीत ट्रॅपपध्ये तब्बल ३१ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली.

गतवर्षी याच कालावधीत ३३१ ट्रॅपमध्ये ४६२ आरोपी होते. यंदा त्यात १०४ वाढीव ट्रॅपची भर पडली. म्हणजेच कोरोनाकाळातही लाचखोर सुसाट सुटल्याचे संतापजनक चित्र आहे. यंदाच्या पहिल्या २०० दिवसांत एसीबीने जे ४३५ ट्रॅप यशस्वी केले, त्यात ६०० लाचखोरांना अटक करण्यात आली. सर्वाधिक लाचखोर क्लास थ्री कर्मचारी आहेत.

२०० दिवसांच्या कालावधीत तब्बल १ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपयांची लाच उकळली.

लाचखोर‘क्लास’लाचेची रक्कम
40क्लास वन २८ लाख ४९ हजार रुपये
56क्लास टू१५ लाख ८५ हजार २०० रुपये
344क्लास थ्री५३ लाख ९१ हजार ७५० रुपये
29क्लास फोर४ लाख ४ हजार ४ लाख ४ हजार
68खासगी व्यक्ती ४ लाख १२ हजार ८०० रुपये
63अन्य लोकसेवक३ लाख २६ हजार ९०० रुपये
600एकूण१ कोटी ९ लाख ६९ हजार ६५० रुपये

 

Web Title: In Covid period, 600 bribe takers arrested, Taking more than 1 crores bribe in 200 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.