शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! चुलत भावांकडून अल्पवयीन बहिणीवर गँगरेप; मदतीस धावलेल्या आजीवरही बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 10:35 IST

Crime News : दोन सख्ख्या भावांनी आपल्या चुलत बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करून तिचा जीव घेतला आहे.

मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. दोन सख्ख्या भावांनी आपल्या चुलत बहिणीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करून तिचा जीव घेतला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेची आजी तिच्या मदतीला आली असता, तिच्यावरही एकाने बलात्कार केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मुंबईमध्ये राहते. मात्र 11 ऑगस्ट रोजी काही दिवसांसाठी जबलपूर येथे तिच्या काकांच्या घरी गेली होती. काही दिवसांनी तिच्या दोन चुलत भावांनी तिच्यावर बलात्कार केला. 19 ऑगस्ट रोजी एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वी तिच्या भावांकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि मारहाण झाल्याचा आरोप मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा मृत्यू झाला.

जबलपूरचे एएसपी प्रदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पीडितेच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलीवर तिच्या दोन चुलत भावांनी बलात्कार केला आणि तिला मारहाण केली. तिच्या मदतीसाठी धावून आलेल्या आपल्या आईवर (पीडितेची आजी) एका आरोपीने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेच्या वडिलांनी केला आहे.

पीडितेच्या चुलत भावांवर भारतीय दंड संहिता आणि पॉक्सो (POCSO) कायद्याच्या संबंधित कलमांनुसार बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला आहे. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा फरार आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून पीडितेवर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची पोलीस सध्या चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी