शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून चुलत भावाची हत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 15:35 IST

Washim Crime News रवी प्रल्हाद सरनाईक (३५) असे मृतकाचे नाव असून, अन्य दोन जखमी झाले.

ठळक मुद्देराजु सरनाईक शिविगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. रवी सरनाईक यांना जबर मारहाण केली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : शेतीच्या जून्या वादावरून झालेल्या हाणामारीत सख्ख्या चुलत भावाचा मृत्यू झाल्याची घटना रिसोड तालुक्यातील कवठा (सरनाईक) येथे १९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. रवी प्रल्हाद सरनाईक (३५) असे मृतकाचे नाव असून, अन्य दोन जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपी अद्याप फरार आहे. कवठा येथील अनिता व रवी सरनाईक या दाम्पत्याची गावालगत दीड एकर शेती असून त्यांच्या शेजारीच नारायणराव माणिकराव सरनाईक यांचे शेत आहे. अनिता सरनाईक यांचे ते नात्याने चुलत सासरे तर रवी सरनाईक यांचे काका आहेत. नारायणराव सरनाईक यांची शेती त्यांचा मुलगा राजु हा करतो. राजु सरनाईक हा वहिनी अनिता सरनाईक, चुलत भाऊ रवी सरनाईक, संजय सरनाईक यांना शेतीच्या कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नेहमी शिविगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. राजु सरनाईक याने १९ नोव्हेंबर रोजी दुपारी येऊन घरी येऊन शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी अनिता सरनाईक यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने काही न ऐकता गणेश नामदेव सावसुंदर (३४) व गोपाल प्रकाश कोल्हे (२६) दोघेही रा. कवठा यांना सोबत घेऊन रवी सरनाईक यांना जबर मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी संजय सरनाईक व प्रल्हाद सरनाईक हे आले असता त्यांनादेखील मारहाण केली.यादरम्यान गावातील प्रतिष्ठित लोकांनी भांडण सोडविले; मात्र या मारहाणीत रवी सरनाईक हे गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता, प्रकृती गंभीर असल्याने प्रथमोपचारानंतर वाशिम येथील खासगी रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने अकोला जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान प्रकृती जास्तच खालावल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी रवी सरनाईक यांना मृत घोषित केले.याप्रकरणी अनिता रवी सरनाईक यांच्या फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी तीन आरोपीविरूद्ध भादंवी कलम ३०२, ३२५, ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. तिन्ही आरोपी फरार असून पुढील तपास रिसोड पोलीस करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडCrime Newsगुन्हेगारी