शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

'सैराट'पेक्षा भयंकर शेवट; चुलत भावाकडून बहिणीची गुप्तांगात गोळी झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 2:54 PM

कुटुंबीयांसमोरच चुलत भावानं झाडल्या बहिणीवर गोळ्या

ठळक मुद्देकुटुंबाकडून हत्या लपवण्याचा प्रयत्न; शवविच्छेदन करण्यासही नकारपोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर हत्येचा उलगडाप्रेमसंबंध मान्य नसल्यानं तीन गोळ्या झाडून मुलीची हत्या

मेरठ: कुटुंबाचा विरोध असूनही प्रेम संबंध ठेवल्यानं चुलत भावानं १९ वर्षीय बहिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या मेरठमध्ये घडली. धक्कादायक बाब म्हणजे चुलत भावानं बहिणीच्या गुप्तांगावर गोळी झाडली. हा संपूर्ण प्रकार पाहून पोलिसदेखील हादरले. मृत मुलीच्या कुटुंबीयांनी हा खून लपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पोलीस चौकशीतून सत्य समोर आलं. चुलत भावानं बहिणीवर तीन गोळा झाडल्यानंतर तिच्या कुटुंबानं तिला जवळच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी संशय आल्यानं रुग्णालय प्रशासनानं घटनेची माहिती पोलिसांना दिली. सुरुवातीला कुटुंबीयांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. घरात चोरीचा प्रयत्न झाला. त्यावेळी मुलीनं चोरांना विरोध केल्यानं त्यांनी गोळ्या झाडून तिची हत्या केली, असा दावा कुटुंबीयांनी केला.

मृत मुलीच्या कुटुंबीयांकडून दिली जाणारी माहिती न पटल्यानं पोलीस मुलीच्या घरी पोहोचले. तिथे त्यांना रक्ताचे डाग दिसले. हे डाग पुसण्याचा प्रयत्न झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर हाती आलेल्या शवविच्छेदन अहवालातून मुलीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली. मुलीच्या मांडीवर, गुप्तांगावर आणि पाठीवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 
पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी करुन तिच्या चुलत भावावर गुन्हा दाखल केला. याशिवाय तिच्या कुटुंबीयांचीदेखील चौकशी केली. 'त्यांच्या घरात रक्ताचे बरेच डाग होते. ते पुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसत होतं. त्या ठिकाणी काही फुटलेल्या बांगड्यादेखील दिसल्या. कदाचित त्या मुलीनं प्रतिकार केला असावा,' अशी माहिती मेरठचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक अविनाश पांडे यांनी दिली. 
या प्रकरणात पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केल्यावर त्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली. कुटुंबातल्या सदस्यांनी शवविच्छेदन करण्यासही नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पीडित तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबाला या नात्याला विरोध होता. त्यामुळे तिच्या चुलत भावानं तिच्यावर गोळ्या झाडल्या. धक्कादायक बाब म्हणजे सर्व कुटुंबीयांच्या समोर हा प्रकार घडला.