मुंबई - पालक घरी नसताना एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्या गालाला चावा घेतल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला पॉक्सो कोर्टाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी त्याला ११ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली होती.१७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्या गालाला चावा घेतल्याप्रकरणी कोर्टात आरोपीविरोधात विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी चाव्याच्या व्रणाचा ऍनालिसिस रिपोर्टसह ठोस पुरावे सादर केले. सुनावणीदरम्यान वकिलांनी सविस्तर अहवालही सादर केला होता. त्याआधी पीडितेने पोलिसांसमोर जबाबही नोंदवला होता. २०१८ ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली. त्यावेळी पीडित तरुणी बारावीत शिकत होते आणि आरोपीला ओळखत होती अशी माहिती तिने पोलिसांना दिली होती. पीडितेनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार १८ ऑक्टोबर २०१८ रोजी ती घरात एकटीच होती. पालक कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी तरुण खोलीत शिरला. त्याने घट्ट मिठीत घेऊन पीडित तरुणीच्या उजव्या गालाचा चावा घेतला. त्यानंतर घाबरलेल्या तरुणीने आरडाओरड केली. पण आरोपीनं तिला सोडलं नाही. बराच वेळ प्रतिकार केल्यानंतर कसाबसा पीडित तरुणीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. त्यानंतर, आरोपीनं पळ काढला होता. नंतर दुसऱ्या दिवशी आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांनी त्याला तुरुंग डांबले होते.याप्रकरणी पॉक्सो कोर्टाने निकाल देत आरोपी तरुणाला ११ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि १ हजार रुपये दंड आकाराला आहे. मात्र, पॉक्सो कोर्टाने पॉक्सो कायद्यान्वये कलमांतर्गत गुन्ह्यातून त्याला दोषमुक्त केले आहे. २०१५ साली या तरुणीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याचा ठपका या दोषी तरुणावर ठेवण्यात आला होता. त्यावेळी पीडित तरुणीचे वय १५ वर्ष होते.
अल्पवयीन तरुणीला घेतला चावा, कोर्टानं 11 महिन्यांचा कारावास ठोठावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:10 IST
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ही घटना घडली होती.
अल्पवयीन तरुणीला घेतला चावा, कोर्टानं 11 महिन्यांचा कारावास ठोठावला
ठळक मुद्देगालाला चावा घेतल्याप्रकरणी २१ वर्षीय तरुणाला पॉक्सो कोर्टाने बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पॉक्सो) दोषी ठरवलं आहे. २०१५ साली या तरुणीचे अपहरण करून तिच्याशी जबरदस्तीने लग्न केल्याचा ठपका या दोषी तरुणावर ठेवण्यात आला होता. पॉक्सो कोर्टाने पॉक्सो कायद्यान्वये कलमांतर्गत गुन्ह्यातून त्याला दोषमुक्त केले आहे.