शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

आसारामची जन्मठेपेच्या शिक्षेविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 21:33 IST

जोधपूर कोर्टाने ही याचिका फेटाळली.

ठळक मुद्देआसारामचे वकील शिरीष गुप्ते आणि प्रदीप चौधरी यांनी युक्तिवाद मांडलाअल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणात दोषी ठरलेला अध्यात्मिक गुरु आसारामला जोधपूर न्यायालयाने २०१८ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आसारामविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस अर्थात अल्पवयीन न्याय आणि भा. दं. वि.च्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जोधपूर  -  स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरु आसारामने जोधपूर कोर्टात त्याला सुनावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर सुनावणी पार पडली असून कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. आसारामचे वकील शिरीष गुप्ते आणि प्रदीप चौधरी यांनी युक्तिवाद करताना कोर्टात सांगितले की, पीडित ही अल्पवयीन नसून आसारामला पॉक्सो कायद्यातील तरतुदीप्रमाणे पॉक्सो कायद्यानुसार दोषी ठरविले नाही पाहिजे. मात्र, जोधपूर कोर्टाने ही याचिका फेटाळली.अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणात दोषी ठरलेला अध्यात्मिक गुरु आसारामला जोधपूर न्यायालयाने २०१८ साली जन्मठेपेची शिक्षा सुनावली. याप्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना प्रत्येकी २० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आले. तर आसाराम पुत्र नारायणसाई दोषी ठरविण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. २०१३ मध्ये शाहजहांपूरच्या १६ वर्षाच्या मुलीने आसाराम याच्यावर जोधपूर आश्रममध्ये बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून आसाराम जेलमध्ये आहे. ६ नोव्हेंबर २०१३ रोजी पोलिसांनी आसाराम आणि त्याचे सहकारी शिवा, शिल्पी, शरद आणि प्रकाश यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. आसारामविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत, जुवेनाईल जस्टिस अर्थात अल्पवयीन न्याय आणि भा. दं. वि.च्या अन्य कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

टॅग्स :Asaram Bapuआसाराम बापूRapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाCourtन्यायालयJodhpur courtजोधपूर न्यायालय