Court grants bail to comedian Bharati and her husband | कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर 

कॉमेडियन भारतीसह तिच्या पतीला कोर्टाचा दिलासा, जामीन मंजूर 

ठळक मुद्देआज दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. ज्यानंतर या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. दोघांनाचाही जामीन मंजूर झाला आहे.

मुंबई - कॉमेडियन भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष एनडीपएस न्यायालयाने या दोघांना जामीन मंजूर केला आहे. किल्ला कोर्टाने १५००० रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे. कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करून भारती आणि हर्ष घरी जाण्यासाठी रवाना झाले आहेत. 

या दोघांनाही ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. एनसीबीने त्याच्या घरी छापा टाकून ही कारवाई केली होती. आता या दोघांना जामिनावर सोडण्यात आलं आहे. अटक केलेल्या ड्रग्ज पेडलरने दिलेल्या माहितीनंतर भारतीच्या घरावर आणि ऑफिसवर एनसीबीने धाड टाकली होती. त्या धाडीत एनसीबीला  ८६.५ ग्रॅमपेक्षा जास्त गांजा सापडला होता. 

एनसीबीने कॉमेडियन भारती सिंगच्या घरावर शनिवारी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आज दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली. ज्यानंतर या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. दोघांनाचाही जामीन मंजूर झाला आहे.

 

Web Title: Court grants bail to comedian Bharati and her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.