शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Suicide in Supaul Bihar: आई-वडील, २ मुली अन् १ मुलगा…; लटकलेल्या अवस्थेत ५ मृतदेह सापडले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2021 11:45 IST

हे संपूर्ण प्रकरण राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं आहे, शुक्रवारी रात्री उशीरा या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली आहे

ठळक मुद्देरुममधून दुर्गंध येऊ लागल्याने शेजारील लोकांनी दरवाजा ठोठावला, पण काहीही उत्तर मिळालं नाहीपोलिसांनी या घराचा दरवाजा तोडला, त्यानंतर आतमधील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.आर्थिक परिस्थितीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सुपौल – बिहारच्या सुपोल परिसरात एकाच कुटुंबातील ५ सदस्यांनी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. माहितीनुसार, ३ मुलांसह पती-पत्नीने एकाच रुममध्ये फाशी घेऊन आत्महत्या केली आहे. मृतकांमध्ये पती-पत्नीसह २ मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. तिघांचे मृतदेह एकाच रुममध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडले, ज्यावेळी या रुममधून दुर्गंध बाहेर येऊ लागला तेव्हा ही घटना उघडकीस आली.

हे संपूर्ण प्रकरण राघोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं आहे, शुक्रवारी रात्री उशीरा या कुटुंबातील सदस्यांनी आत्महत्या केली आहे. रुममधून दुर्गंध येऊ लागल्याने शेजारील लोकांनी दरवाजा ठोठावला, पण काहीही उत्तर मिळालं नाही, त्यानंतर लोकांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर पोलिसांना फोन करून बोलवण्यात आले, पोलिसांनी या घराचा दरवाजा तोडला, त्यानंतर आतमधील दृश्य पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

पोलिसांच्या माहितीनुसार, ज्यावेळी रुमचा दरवाजा उघडला तेव्हा ५ सदस्यांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले पाहायला मिळाले, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि तातडीने तपासाला सुरुवात केली, सुपौल येथे एसपी मनोज कुमार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, पोलीस पथक या घटनेचा तपास करत आहे. सध्या हे प्रकरण आत्महत्या असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आर्थिक परिस्थितीमुळे या कुटुंबाने आत्महत्या केली असावी अशी शक्यता आहे, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

एसपी मनोज कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, या कुटुंबातील प्रमुख व्यवसाय करण्याचा प्रयत्न करत होता, परंतु त्यात यश आलं नाही असं शेजाऱ्यांनी सांगितले, कुटुंब कोळसा खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात, कुटुंबात कोणीही जास्त शिकलेले नाही, फक्त मुलगा शिक्षण घेत होता, मुलींना शिक्षण नव्हतं, सध्या पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर या ५ जणांच्या मृत्यूबाबत स्पष्ट सांगता येईल, सध्या तपास सुरु असल्याने काहीही सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलं, मात्र एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसBiharबिहार