तीन मुलांना विकणाऱ्या जोडप्याला अटक; २ मुलांची केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2022 23:33 IST2022-01-21T23:33:36+5:302022-01-21T23:33:42+5:30

अटक केलेल्या संशयीत आरोपींमध्ये शारदा व आयुब शेख यांचा समावेश आहे. हे दोघे नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात रहात होते.

Couple arrested for selling three children; released 2 children | तीन मुलांना विकणाऱ्या जोडप्याला अटक; २ मुलांची केली सुटका

तीन मुलांना विकणाऱ्या जोडप्याला अटक; २ मुलांची केली सुटका

 नवी मुंबई: नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात राहणा-या दांपत्याने स्वतःच्या तीन मुलांची विक्री केल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांनी दोन्ही संशयीत आरोपींना अटक केली आहे.विकलेल्या दोन मुलींना ताब्यात घेतले असून मुलाचा शोध सुरू केला आहे.

अटक केलेल्या संशयीत आरोपींमध्ये शारदा व आयुब शेख यांचा समावेश आहे. हे दोघे नेरूळ रेल्वे स्टेशन परिसरात रहात होते. सदर महिलेने काही दिवसांपूर्वी मुलीला जन्म दिला होता. तिच्याकडे लहान मुलगी न दिसल्याने तीन दिवसापुर्वी सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाणे महिला व बाल विकास विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाचे अधिकारी व नेरूळ पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोन लाख रूपयांना विकल्याची माहिती दिली. यापुर्वी एक मुलीला 90 हजार रुपयांना व एक मुलास दिड लाख रूपयांना विकल्याचे सांगितले. पोलिसांनी विकलेल्या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे. मुलाचा शोध सुरू केला आहे. आयुब शेख ला ही शुक्रवारी  सायंकाळी अटक केली आहे.

Web Title: Couple arrested for selling three children; released 2 children