शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
2
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
3
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
4
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
5
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
6
सरकार स्थापन होताच 25 दिवस खास तरुणांसाठी! अखेरच्या रॅलीत काय-काय बोलले पंतप्रधान मोदी?
7
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
8
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
9
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
10
जम्मूमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला; लष्कराच्या १६ जवानांवर गुन्हा दाखल
11
आरोग्य सांभाळा! 'या' लोकांसाठी AC ठरू शकतो घातक; फुफ्फुसांचं होईल मोठं नुकसान
12
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 
13
"देशात इंडिया आघाडीची त्सुनामी, वाराणसीत नरेंद्र मोदी पराभूत होणार’’ मोदींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेस नेत्याचा दावा
14
"जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा", मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी
15
OYO ला आर्थिक वर्ष २४ मध्ये १०० कोटींचा निव्वळ नफा; पहिल्यांदाच नफ्यात आली कंपनी
16
"होय, मी संन्यास घ्यायला तयार"; अजित पवारांची अट अंजली दमानियांकडून मान्य, पण...
17
“PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
18
अरे देवा! नवऱ्याने रील बनवण्यास केली मनाई; नाराज झालेली बायको मुलीसह झाली फरार
19
Gautam Gambhir च्या विरोधात 'दादा'? गांगुलीचा BCCI ला सल्ला अन् चाहते बुचकळ्यात!
20
TATA चा 'हा' शेअर विकून बाहेर पडतायत गुंतवणूकदार; एक्सपर्ट म्हणाले, "१३५ पर्यंत येणार..."

Coronavirus : चोर निघाला कोरोना पॉझिटिव्ह, २० पोलिसांना केले क्वारंटाईन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 4:46 PM

Coronavirus : ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने बांगूर नगर पोलीस ठाण्यात एकाच खळबळ उडाली.

ठळक मुद्दे २२ वर्षीय चोर गोरेगाव पश्चिमेला राहतो. त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दुसऱ्या दिवशी रिमांडसाठी चोरांना बोरिवली येथील न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले.

मुंबईचोरी आरोपाखाली एका २२ वर्षीय चोरास बांगूर नगर पोलिसांनी अटक केली. त्यानंतर कोर्टाने त्याला २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात त्याला पाठवत असताना तत्पूर्वी कारागृह प्रशासनाने आरोपीची कोरोना टेस्ट करण्यास सांगितली. ती टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने बांगूर नगर पोलीस ठाण्यात एकाच खळबळ उडाली. त्यामुळे २० पोलिसांना जणांना क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. 

२२ वर्षीय चोर गोरेगाव पश्चिमेला राहतो. त्याच्यावर चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २० एप्रिलला अटक चोर आणि त्याचे दोन मित्र एका पानटपरीतून सिगारेट चोरण्यासाठी गेले होते. या तिघांनी पानटपरीवाल्यावर चाकूचा हल्ला करून त्याच्याकडील ३५०० रुपयांची रक्कम पळवून फरार झाले. या तिघांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. पानटपरीवाल्याच्या तक्रारीनंतर या चोराविरोधात बांगुरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या दिवशी रिमांडसाठी चोरांना बोरिवली येथील न्याय दंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले. तेव्हा २२ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. तळोजा मध्यवर्ती तुरुंगात पाठविण्याआधी करोना टेस्ट झाली नसल्याने तुरुंगाधिकाऱ्याने त्याला तुरुंगात घेण्यास मनाई केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची करोना टेस्ट केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आणि पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.  त्यामुळे २० पोलिसांना १४ दिवसांसाठी क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. तसेच त्याच्या संपर्कातील इतरांचा तपास केला जात आहे. 

टॅग्स :Robberyचोरीcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईPoliceपोलिस