शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Coronavirus : रेमडेसिवीरचा काळाबाजार! फार्मासिस्टला पोलिसांनी केली अटक; १३ हजार विकत होता इंजेक्शन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 18:31 IST

Coronavirus : Remdesivir's black marketing - आरोपीकडून रेमडेसिवीरची १८ इंजेक्शन्स जप्त केली आहेत.

ठळक मुद्दे पंचकुलाचे डीसीपी मोहित हांडा यांनी सांगितले की, रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजार करीत असताना एका फार्मासिस्टला अटक करण्यात आली आहे.

एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणीही झपाट्याने वाढत आहे. याचा गैरफायदा काही लोक घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारे लोक पकडले जात आहेत. या प्रकरणात, गुन्हे शाखेने हरियाणाच्या पंचकुला येथून फार्मासिस्टला रेमडेसिवीरचा काळाबाजार केल्यापरकरणीअटक केली आहे. आरोपीकडून रेमडेसिवीरची १८ इंजेक्शन्स जप्त केली आहेत.पंचकुलाचे डीसीपी मोहित हांडा यांनी सांगितले की, रेमडेसिवीर इंजेक्शनची काळाबाजार करीत असताना एका फार्मासिस्टला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने फार्मासिस्टला पंचकुला सेक्टर-11 मधून अटक केली आहे. पकडलेल्या फार्मासिस्टचे नाव शिवकुमार असे आहे. शिवकुमार झज्जरचा रहिवासी असून नुकताच पंजाबमधील मुबारकपूर येथे शिफ्ट झाला.अशा प्रकारे पकडले फार्मासिस्टलामिळालेल्या माहितीनुसार, प्रभारी अमन कुमार व त्यांच्या गुन्हे शाखा सेक्टर -26 च्या पथकासह पंचकुला ड्रग्स कंट्रोल ऑफिसर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक फार्मासिस्ट बेकायदेशीरपणे कोरोना औषधे निश्चित किंमतीपेक्षा जास्त किंमतीवर विकत आहे. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने बनावट ग्राहक तयार करून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यास सांगितले.आरोपी फार्मासिस्ट शिवकुमार यांनी फोनवर सांगितले की, एका इंजेक्शनची किंमत 13,000 रुपये होती. त्यानंतर गुन्हे शाखेचा बनावट ग्राहक सदस्य इंजेक्शन खरेदी करण्यासाठी गेला आणि त्याला अटक करण्यात आली. घटनास्थळावरून आरोपीकडून रेमडेसिवीरची १८  इंजेक्शन्स जप्त केली आहेत.फार्मासिस्टजवळ आवश्यक कागदपत्रे मिळाली नाहीतजेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी शिवकुमारला खरेदी रेकॉर्ड, औषध विक्री परवाना यासारखी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यास सांगितले तेव्हा घटनास्थळावर कोणताही परवाना किंवा पावती दाखवू शकला नाही. त्यानंतर आरोपीविरुध्द आयपीसी कलम २०२० आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा, अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच दिल्लीहून दोघांना अटकत्याचवेळी रेमडेसिवीरची काळाबाजार करणार्‍या दोन जणांना दिल्लीहून गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपी मेडिकल स्टोअरचा मालकही आहे. अटक केलेल्या दोघांमध्ये गोयल मेडिकोचा मालक बसंत गोयल (४१ आणि त्याच्यासोबत काम करणारा राम अवतार शर्मा (२७) यांचा समावेश आहे. राम अवतार 7 वर्ष गोयल मेडिको येथे कार्यरत होता. पोलिसांनी दोघांवर एफआयआर नोंदविला आहे.

टॅग्स :Arrestअटकcorona virusकोरोना वायरस बातम्याPunjabपंजाबMedicalवैद्यकीयPoliceपोलिस