शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : घराबाहेर पडताना मास्क घातला नाही, दिव्यांग मुलाची वडिलांनी केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 22:24 IST

Coronavirus : पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देमुलगा दिव्यांग होता. आरोपीने कपड्याच्या सहाय्याने मुलाची गळा आवळून हत्या केली होती. आरोपीचा मुलगा लॉकडाऊनमध्ये घराबाहेर जात होता. यावर, त्याच्या वडिलांनी त्याला जबरदस्तीने मास्क घालण्यास सांगितले

लॉकडाऊनदरम्यान घराबाहेर पडताना मास्क घातले नाही म्हणून ७८ वर्षीय वडिलांनी आपल्या पोटच्या ४५ वर्षीय दिव्यांग मुलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार कोलकातामध्ये शनिवारी सायंकाळी घडला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

कोरोना व्हायरसचा फैलाव थांबवण्यासाठी संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊनचा दुसरा टप्पा जारी करण्यात आला असताना अशा गंभीर परिस्थितीत या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर वडिलांनी स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी वंशीधर मलिक श्यामपुकुर पोलीस ठाण्यात आला आणि त्यांनी श्रीशेंदू मलिक या आपल्या मुलाची सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हत्या केल्याचे सांगितले. मुलगा दिव्यांग होता. आरोपीने कपड्याच्या सहाय्याने मुलाची गळा आवळून हत्या केली होती. ही घटना समजताच घटनास्थळी स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी झाले आणि कोलकाता पोलिसांनी देखील पथकानेही या हत्येबद्दल माहिती घेतली.

आरोपी वडील एका खासगी कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी असून, त्याचा मुलगा बेरोजगार होता. तो लहानपणापासूनच दिव्यांग होता. वडील-मुलाची सारखी भांडणं होत असत. मिळालेल्या माहितीनुसार, वडील आणि मुलाचे मास्क घालण्यावरून भांडण झाले. आरोपीचा मुलगा लॉकडाऊनमध्ये घराबाहेर जात होता. यावर, त्याच्या वडिलांनी त्याला जबरदस्तीने मास्क घालण्यास सांगितले.  दिव्यांग मुलाचा राग अनावर झाला. नंतर या प्रकरणात वडील आणि मुलगा यांच्यात भांडण वाढले आणि हत्या घडली. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपी वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या