शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : पुन्हा मास्कचा काळाबाजार; गोडाऊनमधून तब्बल १ कोटींचे मास्क जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 16:53 IST

Coronavirus : सहार येथून १ कोटी किंमतीचा ४ लाख मास्कचा साठा जप्त

ठळक मुद्देविलेपार्ले पोलिसांची मोठी कारवाई, ५ जणांविरुद्ध गुन्हाशहा वेअर हाऊसिंग व ट्रान्सपोर्ट गोडाऊनमधून तब्बल १ कोटी किंमतीचा ४ लाख मास्कचा साठा जप्त

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहार गाव येथून १४ कोटींचा मास्कचा साठा जप्त केला असताना येथीलच शहा वेअर हाऊसिंग व ट्रान्सपोर्ट गोडाऊनमधून तब्बल १ कोटी किंमतीचा ४ लाख मास्कचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणात ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. 

सहार कार्गो येथील काही गोडाऊनमध्ये मास्कचा साठा करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली विलेपार्ले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र काणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिव भोसले आणि गुन्हे अन्वेषण विभागाने या ठिकाणी छापा टाकला. येथील ३ गोडाऊन मध्ये असलेल्या तब्बल २०० बॉक्स मधून ४ लाख मास्कचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गोडाऊन मालक प्रफुल्ल शहासह नितीन जयसिंग, आणि उत्पादक कंपनीविरुद्ध सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत.

अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार थांबवा...अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार केल्यास कोठड़ीची हवा खावी लागेल. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत काळा बाजार करू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी केले आहे.गोडाऊन मालक रडारवर...मास्कचा काळा बाजार उघड़कीस आल्यानंतर मुंबईपोलिसांकडून गोडाऊनची झाडाझडती घेण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाच्या ठिकाणावरील गोडाऊनची तपासणी करत आणखीन कुठे अशा प्रकारे काळा बाजार होतोय का? याची पाहणी सुरु आहे.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबईArrestअटक