शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : लॉकडाऊनमध्ये देखील तो सांभाळतोय तळीरामांची मने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 17:57 IST

Coronavirus : मनाई आदेश भंग करून विदेशी दारू बाळगण्याऱ्यास अटक, गिरीज गावात वसई गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देवसईत गिरीज गावात बंगल्यातून विक्री करत होता तो रु.1,90,750 चा मुद्देमाल जप्त ; आठवड्यातील दुसरी कारवाईपहिल्या घटनेत वसई कोळीवाड्यात 60 हजारांची दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते.

आशिष राणे

वसई - कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे,तसेच जिल्ह्यात देखील मनाई आदेश लागू करण्यात आला आहे,तरीही बिनधास्तपणे वसई पश्चिमेच्या गिरीज गावातील आरोपी ऑल्विन जॉन डिसिल्वा याच्याकडे विदेशी मद्याच्या लाखोंच्या व्हिस्कीच्या बॉटल्स वसई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट ने हस्तगत केल्या आहेत. 

या प्रकरणी पोलिसांनी गिरीज येथून आरोपीच्या घरातुन रु.1 लाख 90 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याच्यावर वसई पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वसई पोलिसांनी लोकमत'ला दिलीदरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीज येथील या आरोपींकडे  प्रोव्हीबिशन गुन्ह्याचा माल आढळून आला असून यामध्ये बॉम्बे सफायर ब्लेंडेड जीन, युवन विलियम्स ब्लेंडेड व्हिस्की, वोडका जॉनी वॉकर व्हिस्की, ब्रांड मास्टर वोडका ,वाईट विस्की ,बकार्डी रम ,व्हेलगा नोबल वोडका ,इंटेन्स वोडका, स्काय इन्फ्युजन वोडका ,स्मिर्नोफ वोडका, जॉनी वॉकर ,ब्लॅक लेबल, रिझल्ट स्कॉच व्हिस्की जॉनी वॉकर प्लॅटिनम ,गोल्ड लेबल व्हिस्की अशा विविध विदेशी कंपन्यांच्या दारूच्या बॉटल्स मिळून एकूण रु.1 लाख 90 हजार 750 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.या आरोपीविरुद्ध कलम 188, 269 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 51 (ब) दारूबंदी अधिनियम 65 (फ)भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 नुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.  सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पालघर वसई युनिट पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली असून या आठवडाभरातील ही दुसरी घटना असून पहिल्या घटनेत वसई कोळीवाड्यात 60 हजारांची दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते.

टॅग्स :PoliceपोलिसVasai Virarवसई विरारArrestअटकliquor banदारूबंदी