शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : तबलिगी जमातचे मौलाना साद यांना क्राईम ब्रँचची नोटीस, विचारले हे 26 प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2020 15:21 IST

CoronaVirus : एका दिवसापूर्वी मौलाना साद यांनी आपला एक ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यात त्यांनी आपण आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले आहे.

ठळक मुद्देमरकजमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे का आणि जर लावले आहेत तर ते कुठे कुठे लावण्यात आले आहेत.या प्रकरणी मौलाना साद यांच्यासह सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीच्या निझामुद्दीनस्थित तबलिगी जमातचे मौलाना मोहम्मद साद यांना क्राईम ब्रँचने नोटीस बजावली आहे. क्राईम ब्रँचचे पथकाने मरकजसंबंधी 26 प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. दरम्यान, मौलाना साद यांच्या शोधासाठी पोलीस अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. एका दिवसापूर्वी मौलाना साद यांनी आपला एक ऑडिओ क्लिप जारी केली होती. त्यात त्यांनी आपण आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले आहे.

क्राईम ब्रँचकडून पाठवलेल्या नोटिसद्वारे संस्थेचा पूर्ण पत्ता, नोंदणीसंबंधी सविस्तर माहिती, संस्थेतील कर्मचाऱ्यांची संपूर्ण महिती ज्यात त्यांचा घरचा पत्ता आणि मोबाईल क्रमांक आहे, मरकजच्या व्यवस्थापनाशी जोडलेल्या लोकांची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. त्याचबरोबर ही सर्व सामील लोकं कधीपासून मरकजशी जोडलेले आहेत.

तसेच मरकजची मागील 3 वर्षांच्या आयकराची माहिती, पॅन कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि एका वर्षाची बँक स्टेटमेंटची माहिती मागवली आहे. 1 जानेवारी 2019 पासून आतापर्यंत मरकजशी संबंधीत सर्व धार्मिक कार्यक्रमाची माहिती देखील मागितली आहे. विचारण्यात आले आहे की, मरकजमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे का आणि जर लावले आहेत तर ते कुठे कुठे लावण्यात आले आहेत.

दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या पथकाने मौलाना साद यांना पोलीस किंवा प्रशासनाकडून धार्मिक कार्यक्रमासाठी लोकांचा जमाव जमवण्यासाठी कधी परवानगी घेतली होती का, परवानगी मिळाल्याबाबत असलेली कागदपत्रे, 12 मार्चनंतर मरकजला आलेल्या सर्व लोकांची संपूर्ण माहिती द्या, ज्यात परदेशी आणि भारतीयांचा समावेश आहे, असे प्रश्न विचारले आहेत.

क्राईम ब्रँचने अजून विचारले की, 12 मार्च 2020 नंतर मरकजमध्ये कोण - कोण आले होते, किती लोक होते, जे आजारी होते आणि ज्यांना रुग्णालयात दाखल केले गेले त्यांची पूर्ण माहिती द्या, मरकजशी कोरोना कनेक्शनबाबत क्राईम ब्रँच तपास करत आहेत. या प्रकरणी मौलाना साद यांच्यासह सात लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तरी मौलाना साद यांना अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली