शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे होते; गुजरातच्या भाजपा नेत्याचं खळबळजनक विधान
2
"तुमको मिर्ची लगी तो मै क्या करूं..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला
3
टाटा-रिलायन्सला धक्का! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; गुंतवणूकदारांचे १.३५ लाख कोटी स्वाहा!
4
"अजून ७० हजार कोटींचा निकाल लागलेला नाही, आम्ही मागची पानं चाळली तर त्यांना...", अजित पवारांना बावनकुळेंचा इशारा
5
नाशिकमध्ये शिंदेंचं बळ वाढलं, माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक शिंदेसेनेत 
6
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या मराठी शुभेच्छा, Messages, WhatsApp Status शेअर करून आनंद द्विगुणित करा
7
Hidayat Patel: काँग्रेसचे जेष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला; प्रकृती चिंताजनक!
8
६.७७-इंचाचा डिस्प्ले, १०८ MP कॅमेरा, ५५२० mAh बॅटरी; रेडमी नोट १५ 5G भारतात लॉन्च!
9
वजन कमी करायचंय... मग 'जेलमध्ये' जा! काय आहे 'फॅट प्रिझन्स'? जगभरात रंगलीय तुफान चर्चा
10
मुंबईत मनसेला भगदाड, भाजपापाठोपाठ शिंदेसेनेचाही धक्का; प्रवक्त्यांसह नेत्यांचा पक्षाला रामराम
11
१० वर्षांत बना 'करोडपती'! दरमहा SIP द्वारे १ कोटींचा निधी उभारण्याचे गणित; किती करावी लागेल गुंतवणूक?
12
तुम्ही बुरखा घालून मागच्या दाराने विधानसभेत गेलात; रावसाहेब दानवे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
13
'हिंदूंची हत्या ही एक किरकोळ घटना'; बांगलादेशी नेत्याचे धक्कादायक विधान
14
‘राजसाहेब तहात हरले, कुटुंबं एकत्र करण्यासाठी मनसेचा बळी दिला’, संतोष धुरींचा सनसनाटी दावा 
15
रील पाहता पाहता श्वास थांबला, पलंगावर बसलेल्या १० वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
16
मुकेश अंबानींच्या 'या' स्टॉकमध्ये दिसली गेल्या ८ महिन्यांतील सर्वाधिक घसरण, काय आहे शेअर आपटण्यामागचं कारण?
17
Vijay Hazare Trophy : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आधी गिल फ्लॉप; श्रेयस अय्यरनं हिट शोसह दाखवला आपला फिटनेस
18
VIDEO: "निघ नाहीतर गोळी घालेन..."; सीमेवर व्हिडीओ काढणाऱ्या बांगलादेशींना BSF जवानाचा इशारा
19
"तुम्हालाच नाईलाजाने आमची विचाराधारा स्वीकारावी लागतेय, हेच सत्य", आशिष शेलारांना अमोल मिटकरींचे खडेबोल
20
ईपीएफओ पेन्शनधारकांचे अच्छे दिन! किमान पेन्शनमध्ये ५ पटीने वाढ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : आणखी 5 तबलिगी सापडले, धारावी पोलिसांनी घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:46 IST

Coronavirus : निझामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देखील 50 ते 60 जण मोबाईल बंद ठेवून लपून बसले आहेत.

ठळक मुद्देदिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमात मरकजला सभागी झालेल्या 150 व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यातील अनेकांना वेगळे (क्वारंटाईन) करण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील लपून बसलेल्या ५० ते ६० तबलिगीना स्वतः हून पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 

मुंबई - देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. प्रत्येक देशात कोरोनाला आळा घालण्याची अतोनात प्रयत्न सुरू आहेत. भारताने देखील कोरोनाला अटकाव करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच दिल्लीतील निझामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून देखील 50 ते 60 जण मोबाईल बंद ठेवून लपून बसले आहेत, त्यापैकी 5 तबलिगीचा शोध धारावीत लागला असून धारावी पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले आहे.

दिल्ली येथील मरकजमधील तबलिगी जमातच्या कार्यक्रमला उपस्थित राहून देखील माहिती लपवल्याच्या आरोपाखाली 150 व्यक्तींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आझाद मैदान पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वि.  कलम 188, 269 व 270 अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमात मरकजला सभागी झालेल्या 150 व्यक्तींची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ त्यांचा शोध घेऊन त्यातील अनेकांना वेगळे (क्वारंटाईन) करण्यात आले. मात्र, देशात आणि राज्यात कोरोनाला अटकाव करण्यासाठी सामूहिक कार्यक्रम करण्यास मनाई असतानाही मुंबईतील 150 व्यक्ती या तबलिगीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तसेच त्याची माहिती लपवल्याप्रकरणी आता मुंबई पोलिसांनी या 150 व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील लपून बसलेल्या ५० ते ६० तबलिगीना स्वतः हून पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहन केले आहे. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई