मुंबई - करोनावर उपचार घेत असलेले १५ संशयित रुग्ण क्वारंटाइनमधून पळाले होते. मात्र, या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते. हे सर्वजण मूळचे पंजाबचे आहेत. त्यांच्या हातावर क्वारंटाइनचा स्टॅम्प मारलेला होता. त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून न हालण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कॅम्पमधून पळाले. अंधेरीत त्यांनी लोकल पकडली आणि खारमध्ये उतरले. त्यांना खारमध्येच ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या १५ जणांना पकडण्यासाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली होती.
Coronavirus : मुंबईत क्वारंटाइनमधून पळालेल्या १५ जणांची धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 16:39 IST
Coronavirus : हे सर्वजण मूळचे पंजाबचे आहेत.
Coronavirus : मुंबईत क्वारंटाइनमधून पळालेल्या १५ जणांची धरपकड
ठळक मुद्दे खारमध्येच ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. हे १५ संशयित खारमध्ये असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती.या १५ जणांना पकडण्यासाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली होती.