शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

Corona Vaccination : दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन आणि शार्प शूटरलाही लस; दोन हजारांवर कैद्यांचे लसीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 23:19 IST

Corona Vaccination : शासन आणि प्रशासनाने पुण्याच्या येरवडा आणि मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहासह नागपुरातील मध्यवर्ती कारागृहालाही लस उपलब्ध करून दिली आहे.

- नरेश डोंगरे

 नागपूर : ठिकठिकाणच्या बॉम्बस्फोटातील दहशतवादी, अंडरवर्ल्ड डॉन, मुंबई, गोवासह ठिकठिकाणचे शार्प शूटर आणि गंभीर आरोपात बंदिस्त असलेल्या विदेशी गुन्हेगारांचासह सुमारे २२०० कैद्यांना कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी येथील मध्यवर्ती कारागृहात लस दिली जाणार आहे. गुरुवारी सकाळपासून त्यासाठी लसीकरण सुरू होणार आहे. 

शासन आणि प्रशासनाने पुण्याच्या येरवडा आणि मुंबईच्या ऑर्थर रोड कारागृहासह नागपुरातील मध्यवर्ती कारागृहालाही लस उपलब्ध करून दिली आहे. या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची वसाहत तसेच सुधार आणि पुनर्वसन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी सकाळी लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात देशातील विविध भागात बॉम्बस्फोट घडवून आणणारे इंडियन मुजाहिद्दीनचे दहशतवादी भटकळ बंधू तसेच मुंबईच्या बॉम्बस्फोट मालिकेतील आणि पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटातील सिद्ध दोष दहशतवादी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. येथेच मुंबई अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि विविध डोळ्यांमधील गुंड तसेच अमली पदार्थांची तस्करी करणारे देश-विदेशातील गुन्हेगार आणि  शार्प शूटरही नागपूरच्या कारागृहात बंदिस्त आहेत. यांच्यातील अरुण गवळीसह अनेकांना कोरोनाची बाधा झाली होती. कैद्यांनाच नव्हे तर कारागृहाची सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासन सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांसह २२ अधिकारी कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

विशेष म्हणजे, कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी औषधोपचाराची विशिष्ट पद्धत कारागृहात राबविल्यामुळे एकाही कोरोना बाधिताचा मृत्यू झाला नाही. मात्र, दररोज नवीन कैद्यांची कारागृहात भर पडत असल्याने कोरोनाचा धोका रोजच वाढतो आहे. या पार्श्वभूमीवर, कारागृहातील सर्वच्या सर्वच कैद्यांचे लसीकरण व्हावे यासाठी शासन प्रशासन स्तरावर नागपूर मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने विशेष प्रयत्न केले.  त्याला यश आले असून मध्यवर्ती कारागृहासाठी प्रशासनाने मुबलक लस साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी १० वाजता मध्यवर्ती कारागृह परिसरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

कारागृह इस्पितळातील वैद्यकीय पथक सज्जगुरुवार सकाळी सुरू होणाऱ्या कैद्यांच्या लसीकरणासाठी मध्यवर्ती कारागृहातील तीन डॉक्टर, तीन वैद्यकीय कर्मचारी आणि महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या दोन परिचारिका कैद्यांना लस देणार आहेत. प्रारंभी ४५ वर्षाच्यावरील कैद्यांना लस दिली जाईल आणि त्यानंतर उर्वरित वयोगटातील सर्वच्या सर्व कैद्यांना लस दिली जाणार असल्याचे कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांनी लोकमतला सांगितले.

१८ ते ८५ चा वयोगटकारागृहात बंदिस्त कैद्यांमध्ये १८ वर्षांपासून ८५ वर्षापर्यंतच्या कैद्यांचा समावेश आहे. त्यात ४० टक्के सिद्धदोष (शिक्षा सुनावलेले) गुन्हेगार असून ६० टक्के कैदी न्यायप्रविष्ट (अंडरट्रायल) आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस