शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रणजित कासलेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयाबाहेर सरकारविरोधात घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 06:40 IST

कासलेने न्यायालयाच्या बाहेरच्या आवारात महायुती सरकारच्या विरोधात केली घोषणाबाजी

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वादग्रस्त विधाने करून प्रसिद्धीच्या झोतात आलेला बडतर्फ पोलिस अधिकारी रणजित कासलेला मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कासलेला मुंबई पोलिसांनी दिल्लीमध्ये अटक केली होती. त्याच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल होता, त्यानंतर मुंबईत देखील गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणे व राजकीय नेत्यांविरोधात केलेल्या आरोपांप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.कासलेंचा उद्देश तपासण्यासाठी पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

न्यायालयाबाहेर कासलेची सरकारविरोधात घोषणा

कासले सुरुवातीपासून पोलिसांना सहकार्य करत असल्याने त्याला पोलिस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद कासलेचे वकील नवनाथ देवकते यांनी केला. कासलेने जे आरोप केले आहेत ते खरे आहेत की खोटे, ते तपासा आणि नंतर कारवाई करा, केवळ आरोप केले म्हणून अटक कशी करता येईल. त्यामुळे ही अटक बेकायदा असल्याचे सांगत वकिलांनी त्याचा जामीन अर्ज दाखल केल्याची माहितीही दिली. न्यायालयातून बाहेर जाताना कासलेने इन्कलाब जिंदाबाद, महाराष्ट्र सरकार हाय हाय अशी घोषणाबाजीही केली. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याPoliceपोलिस