शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा ताबा मिळविण्यासाठी गुंडांशी ‘संग’ हवालदार ‘निलंबित’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 11:31 IST

Crime News: बाणेर येथील बहुचर्चित जमिनीचे प्रकरण

पुणे : बाणेर येथील जमिनीसाठी गुंडांशी संग करण्याचा प्रयत्न एका नामांकित पोलीस हवालदाराला चांगलाच अंगाशी आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात असताना बाणेरमधील जमिनीचे डिल करणार्‍या पोलीस हवालदार सुनिल सुदाम पवार याला पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी निलंबित केले आहे. 

हवालदार सुनिल पवार हे सध्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणूकीला असतानाही बाणेर येथील जागेबाबत ते पैशांची देवाण घेवाणीबाबत चर्चा करत होते. बाणेर येथील स़नं. ३३/२ पैकी १ येथील २३.१० गुंठे जागेवर काही गुंडांनी पोलिसांच्या मदतीने अतिक्रमण करुन बेकायदेशीरपणे ११ जानेवारी २०२१ रोजी ताब्यात घेतली होती. त्याबाबत अमोल पांडुरंग कळमकर (रा. माधवबाग सोसायटी, बाणेर) यांनी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी केली. 

बाणेर येथील जमीनवर पोलिसांच्या सहाय्याने काही गुंडांनी जबरदस्तीने अतिक्रमण करुन ताबा घेतला आहे. त्याबाबत चतु:श्रृंगी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेण्यात न आल्याने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. तसेच ऋषिकेश बारटक्के यांनी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यांची चौकशी केली असताना त्यांनी त्यांच्याकडे असलेले ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखविले. त्यात हवालदार सुनिल पवार हे त्या जागेचा ताबा मिळवण्याकरीता पैशांची देवाण घेवाणीची चर्चा करत असल्याचे दिसत आहे. तसा ऋषिकेश बारटक्के यांचा सविस्तर जबाब घेण्यात आला आहे. याबाबत झालेली चौकशीवरुन व सादर केलेल्या ऑडिओ व व्हिडिओ रेकॉडिंगवरुन हवालदार सुनिल पवार यांनी शिस्तप्रिय पोलीस खात्यास कर्तव्यास असून त्यांचे वर्तन हे पोलिसांबद्दल जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारी असून त्यांचे वर्तन बेशिस्त व बेजबाबदारपणाचे असून पोलीस दलास अशोभनीय आहे. त्यामुळे सुनिल पवार याला निलंबित करण्याचा आदेश पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी काढला आहे.

गुंडांशी संग केल्याने पोलीस हवालदाराला निलंबित केले असले तरी अतिक्रमण करुन जमिनीचा ताबा घेतल्याप्रकरणी अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस