शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

प्रार्थनास्थळांच्या प्रसादात विष कालवण्याचा त्यांनी आखला होता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 18:20 IST

ते आयसिसने प्रेरित झाले असून ‘टेलिग्राम सोशल अॅप’द्वारे परकीय हस्तकांशी संपर्कात असावेत, असा संशय एटीएसने न्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.

औरंगाबाद - मुंब्रा आणि औरंगाबादेतून एटीएसने अटक केलेल्या त्या नऊ आयएस संशयितांनी मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथील प्रार्थना स्थळांच्या प्रसादात विष कालविण्याचा कट रचला होता. त्यांच्याकडून वेगवेगळी विषारी द्रव्ये, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच ते आयसिसने प्रेरित झाले असून ‘टेलिग्राम सोशल अॅप’द्वारे परकीय हस्तकांशी संपर्कात असावेत, असा संशय एटीएसनेन्यायालयात व्यक्त केला. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १४ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे.

एटीएसने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून २२ जानेवारीच्या पहाटे ८ जणांना अटक केली होती. या संशयितांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना सोमवारी एटीएसचे विशेष न्यायाधीश टी. आर. चौधरी यांच्या समोर हजर केले. यात मजहर अब्दुल रशीद शेख, मो. तकी ऊर्फ अबू खालीद सिराजउद्दीन खान, मो. मुशाहीद उल इस्लाम, मो. सर्फराज ऊर्फ अबू हमजा अब्दुल हक उस्मानी, जमान नवाब खुटेउपाड, सलमान सिराजउद्दीन, फहाज शेख, मोहसीन सिराजउद्दीन याच्यासह एका अल्पवयीन आरोपीचा समावेश आहे. यावेळी एटीएसच्या वतीने जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे यांनी बाजू मांडली. आरोपींनी विशिष्ट विचारसरणीने प्रेरित होऊन दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला होता. यासाठी आवश्यक असलेली स्फोटके तयार करण्यासाठी वस्तूंची जमवाजमव केली. हे जप्त केलेल्या वस्तूंमधून स्पष्ट झाले आहे. आरोपींकडून विशिष्ट समुदायाच्या मंदिरातील महाप्रसादात विष कालविण्याचा कटही आखण्यात आला होता. यासाठी वापरण्यात येणारे विषारी औषध तपास संस्थेने जप्त केले. आरोपींकडे सापडलेल्या लॅपटॉप, पेनड्राईव्ह, हार्डडिस्क आदींचा तपास सुरू आहे. या इलेक्ट्रॉनिक साहित्याची तपासणी करण्यात संशयितांकडून सहकार्य मिळत नाही. आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इसिसच्या बाबतीतील पुस्तके, व्हिडिओ क्लिपसह इतर साहित्य संशयितांकडे सापडले आहे. हे साहित्य कोणी पुरवले, याचाही तपास बाकी आहे. नऊ जणांशिवाय या कटात इतरांचा सहभाग आहे. अ‍ॅपच्या माध्यमातून कोणत्या परदेशी व्यक्ती चॅट करीत होत्या, याची माहिती मिळणे बाकी असल्यामुळे आरोपींच्या पोलीस कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्याची मागणी देशपांडे यांनी केली. न्यायाधीशांनी आरोपींच्या कोठडीत ९ दिवसांची वाढ केली.

टॅग्स :Anti Terrorist SquadएटीएसCourtन्यायालयTempleमंदिरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी