शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरला विषारी इंजेक्शन देण्याचा कट; खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 08:54 IST

ठाणे खंडणीविरोधी पथकाची कारवाई

ठाणे : नाशिकमधीलडॉक्टरच्या खुनासाठी ३ लाखांची सुपारी देऊन विषारी इंजेक्शन आणि सिरींज देणाऱ्या  नेहा जाधव उर्फ जोत्स्ना अमोल पगारे (४७, रा. अशोकनगर, बाळकुमपाडा, ठाणे) या महिलेला अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने २१ जानेवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास केली.

आरोपी महिलेला २४ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिल्याची  माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी रविवारी दिली. ठाण्याच्या बाळकूम भागात राहणारी नेहा  ही नाशिकच्या एका डॉक्टरच्या खुनासाठी सुपारी देणार असून, ती मारेकऱ्याच्या शोधात असल्याची टीप खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांना मिळाली. बागडे यांनी बनावट मारेकरी म्हणून एका व्यक्तीला तिच्याकडे पाठविले. 

अशी झाली गुन्ह्याची उकल नेहाने डॉ. किरण बेंडाळे यांच्या खुनासाठी  तीन लाखांची सुपारी त्याला दिली. डॉ. किरण  यांचा फोटो, काम करण्याच्या ठिकाणाची माहिती, विषारी इंजेक्शन, सिरींजही मारेकऱ्याला तिने  दिले. हा प्रकार उघड झाल्यानंतर या बनावट मारेकऱ्याने नेहाविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५० लाखांसाठी धमक्याआरोपी महिलेचे डॉ. किरण याच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचा फायदा घेऊन ती त्यांना  ब्लॅकमेल करून ५० लाखांच्या खंडणीची मागणी करीत होती. खंडणी न दिल्यास त्यांना  ठार मारण्याची धमकी ती वारंवार देत होती, असे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती बागडे यांनी दिली.

टॅग्स :docterडॉक्टरthaneठाणेNashikनाशिक