शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्याने बनावट घड्याळ महाग दिल्यावरून राडा; २० ते २२ जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 21:43 IST

Crime News : मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर शांतीसागर हॉटेल समोर मोहम्मद हरशद सलीम गालप हा फेरीवाला घड्याळ विक्रीचा व्यवसाय बाकडा लावून करतो.

मीरारोड - फेरीवाल्याने कंपनीचे बनावट घड्याळ महाग दिले या कारणा वरून फेरीवाल्याच्चे साथीदार आणि खरेदीदारचे साथीदार यांच्यात मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर तुंबळ राडा झाल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी दोन्ही बाजूने एकमेकां विरुद्ध फिर्याद घेऊन २० ते २२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे . 

मीरारोड रेल्वे स्थानकाबाहेर शांतीसागर हॉटेल समोर मोहम्मद हरशद सलीम गालप हा फेरीवाला घड्याळ विक्रीचा व्यवसाय बाकडा लावून करतो. रविवारी रात्री हरशद,  त्याचा भाऊ सैफ आलम व राजा आलम आणि मित्र अब्दुल वाहीद उल्डे असे चौघे घड्याळ विक्रीच्या बाकड्या जवळ होते. अब्दुलच्या फिर्यादीनुसार, आसीफ खान, साजेद अली खान, सऊद शेख इतर  ७ ते ८  जणांनी मिळून  हरशद, सैफ, राजा व अब्दुल यांना धक्का बुक्की करुन खाली पाडुन लाथा ,बुक्याने बेदम मारहाण केली. पोलिसांनी आसीफ खान , साजेद अली खान, सऊद शेख इतर  ७ ते ८  जणांवर गुन्हा दाखल केला आहे .  

आसिफ खान याने दिलेल्या फिर्यादी वरून पोलिसांनी राजा आलम, सैफ आलम, हरशद गालप , अब्दुल  उल्डे सह त्यांच्या अन्य ६ ते ७ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .  समीर खान याला त्याच्या वसई येथील मित्राने फेरीवाला हरशद कडून घडयाळ विकत घेवुन गिफ्ट दिले होते. ते घडयाळ समीर याने आसिफला दाखवले . घड्याळ पाहून ते डुप्लिकेट असून महाग दिले असल्याचे आसिफ म्हणाला . 

घड्याळ बदलण्यासाठी फेरीवाल्या कडे गेले. हरशद ला सदर घड्याळ डुप्लिकेट असल्याने पैसे परत कर असे सांगतले असता त्याने नकार दिला . त्यावरून शिवीगाळ होऊन त्याचे पर्यवसान राड्यात झाले . राजा , सैफ , हरशद  , अब्दुल व इत्तर ६ ते ७ जणांनी मिळून  आसिफ खान , समीरखान, झेन शेख व आसिफ शहा याना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली  म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसmira roadमीरा रोडArrestअटक