शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! कॉम्प्रेसर प्रेशरचा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसवला; पोटात हवा भरल्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 21:29 IST

Death Case : मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. तर अब्दुल रफिक मन्सुरी ( वय ३२) असे पोटात हवा शिरल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

भिवंडी  - वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेसर प्रेशर मशीनचा पाईप तरुणाच्या गुदव्दारात घुसवून पोटात हवा भरल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शहरातील सिल्क मिल्स लूम कारखान्यात घडली आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा कामगारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. तर अब्दुल रफिक मन्सुरी ( वय ३२) असे पोटात हवा शिरल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत अब्दुल हा भिवंडीतील खाडीपार भागातील एका चाळीत राहून तो त्याच भागात असलेल्या सिल्क मिल्स लूम कारखान्यात लूमकामगार म्हणून कार्यरत होता. तर दोन्ही आरोपीही याच लूम कारखान्यात लूमकामगार म्हणून कार्यरत आहेत.  २६ नोव्हेंबर २०२१  रोजी रात्री ८ वाजल्याच्या सुमारास मृतक व आरोपींची कारखान्यात मजाक मस्करी सुरु होती. त्यातूनच दोघा आरोपीने कारखान्यात असलेल्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेसर प्रेशर मशीनचा पाईप अब्दुलच्या गुदव्दारात घुसवून मशीन सुरु केली. त्यावेळी  गुदव्दारावाटे हवा जोरात पोटात जाऊन आतड्याना गंभीर दुखापत झाली होती. यात अब्दूलला त्रास झाल्याने त्याला भिवंडीतील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच बुधवारी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाच्या नातेवाईक शबोउद्दीन मन्सुरी यांच्या तक्रारीवरून निजामपूर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपीविरोधात भादवी. कलम  ३०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. गुरुवारी अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

टॅग्स :BhiwandiभिवंडीPoliceपोलिसDeathमृत्यू