शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

शेतमजूर महिलांना पैसे दाम दुप्पटीच्या आमिषाने झारखंडच्या कंपनीचा ४ कोटींना गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 22:00 IST

सुरुवातीच्या काळात पैसे भरल्यानंतर काही महिलांना व्यवस्थित परतावा देखील देण्यात आला होता. यामुळे इतर महिलांचा विश्वास वाढला आणि त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.  

ठळक मुद्देयवत येथील प्रकार : चार कोटी पेक्षा अधिक रूपयांचा अपहार पाच वर्षांत दुप्पट पैसे मिळणार तर दररोज पैसे भरण्याची योजना

यवत : यवत व परिसरातील शेतमजूर महिलांना पैसे दाम दुप्पट करण्याच्या नावाखाली झारखंड मधील एका खाजगी कंपनीने सुमारे चार कोटीपेक्षा अधिक रुपये जमा करून फसवणूक केली आहे.         मागील चार ते पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असून आता महिलांना दाम दुप्पट परतावा मिळणार नाही असे समजल्यावर सर्व महिलांनी थेट यवत पोलीस ठाणे गाठून त्यांचे गा-हाणे मांडले आहे. परिसरातील वेगवेगळ्या वाड्या वस्त्यांवर शेतमजुरी करणा-या महिलांनी आपल्या प्रपंचाला हातभार लागेल अशा अपेक्षेने संबंधित योजनेत गुंतवणूक केली होती.       फसवणूक करणा-या खाजगी कंपनीने आमिष दाखविणा-या विविध योजना महिलांसमोर मांडल्या होत्या. एक रकमी लाख रुपयांचे पेक्षा जादा रक्कम भरल्यास पाच वर्षांत दुप्पट पैसे मिळणार तर दररोज पैसे भरण्याची योजना देखील आखण्यात आली होती.       सर्वसामान्य महिलांना सावज बनवत स्थानिक महिला एजंटच्या मदतीने ही रक्कम गोळ्या करण्यात आले आहेत. संबंधित खासगी कंपनीने राज्यात अनेक ठिकाणी गुंतवणूक स्वरूपात मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले असल्याचे यवत परिसरातील महिलांनी सांगितले.  सुरुवातीच्या काळात पैसे भरल्यानंतर काही महिलांना व्यवस्थित परतावा देखील देण्यात आला होता. यामुळे इतर महिलांचा विश्वास वाढला आणि त्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली.  फसवणूक झालेल्या जवळपास सर्व महिला  शेतमजूर असल्याने रविवारी त्यांनी गावातील स्थानिक नेत्यांना फसवणुकीचा प्रकार सांगितल्यावर त्यांनी यवत येथील भैरवनाथ मंदिरात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य  गणेश कदम, अरविंद दोरगे,  श्रीपती दोरगे ,  मोहसीन तांबोळी, नामदेव दोरगे, अविनाश अवचट, अशोक दोरगे   यांनी फसवणूक झालेल्या महिलांना पोलीस ठाण्यात झाल्या प्रकाराबद्दल तक्रार देण्याबाबत मार्गदर्शन केले.   यवत व परिसरातील महिलांचे म्हणणे ऐकले असून फसवणूक प्रकरणाबाबत संपूर्ण माहिती घेऊन पोलीस कारवाई करतील. मात्र आर्थिक दृष्या फसवणुकीचे प्रकार आता नवे राहिलेले नाहीत. त्यामुळे व्यावहार करताना नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे मत पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचारfraudधोकेबाजी