मुंबई - सहकारी तरुणी कपडे बदलत असताना चोरून मोबाईलद्वारे चित्रीकरण करणाऱ्या एका माथेफिरूला पवई पोलिसांनी बेड्या ठोकल्या केली. प्रदीप रॉय असं या विकृताचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पीडित तरुणी (२३) ही पवई येथे एका महिलेकडे कामाला असून या महिलेच्याच घरात तिच्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी पीडित तरुणीकडे होती. याच महिलेच्या घरात जेवण बनविण्याचे काम प्रदीप रॉय करतो. घरात पीडित तरुणीला राहण्यासाठी वेगळी खोली होती. मात्र, नोकर वर्गासाठी स्वच्छतागृह एकच होते. या स्वच्छतागृहात पीडित तरुणी कपडे बदलत असताना तिला स्वच्छतागृहात काही तरी चमकत असल्याचे आढळले. त्यावेळी प्रदीपचे बिंग उघड झाले. तिने जवळ जाऊन पाहिले असता, तो मोबाईल असल्याचे आढळले. यावेळी तरुणीने तात्काळ घर मालकिणीच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पवई पोलिसांनी प्रदीप रॉय याला अटक केली असून पुढील तपास करत आहे.
कपडे बदलताना सहकारी तरुणीचे चित्रिकरण; विकृत नोकराला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 21:30 IST
तरुणीने तात्काळ घर मालकिणीच्या निदर्शनास ही बाब आणून दिली.
कपडे बदलताना सहकारी तरुणीचे चित्रिकरण; विकृत नोकराला अटक
ठळक मुद्दे प्रदीप रॉय असं या विकृताचे नाव असून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.तिला स्वच्छतागृहात काही तरी चमकत असल्याचे आढळले. त्यावेळी प्रदीपचे बिंग उघड झाले.