शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

दीड कोटीचे कोकेन आग्रीपाडा येथून जप्त; सापळा रचून परदेशी आरोपीला केली अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 15:33 IST

Drug case : हा आरोपी अमली पदार्थ खरेदी विक्री करीत असून त्याची एक मोठी टोळी असल्याची शक्यता असून त्याचा आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे चिकुएमेका इमान्युअल एनवॉन्को, वय ३५ असं अटक आरोपीचे नाव आहे. 

अमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटने मध्यरात्री आग्रीपाडा येथील लाल मैदानाजवळ ५०० ग्राम वजनाचे कोकेनची तस्करी करणाऱ्या परदेशी इसमास अटक केली आहे. या कोकेनची किंमत दीड कोटी आहे.  चिकुएमेका इमान्युअल एनवॉन्को, वय ३५ असं अटक आरोपीचे नाव आहे. २३ मार्चला अमली पदार्थ विरोधी कक्ष, आझाद मैदान युनिटचे पोलीस निरीक्षक मसवेकर यांना त्यांच्या विश्वासु बातमीदाराकडुन प्राप्त माहितीबाबत वरिष्ठांना माहीती देऊन घटनास्थळी सापळा रचण्यात आला असता त्या ठिकाणी खबरीने दिलेल्या माहीतीच्या अनुषंगाने आरोपी विकुएमेका इमान्युअल एनवॉन्को हा सापडला. त्यानंतर नमूद इसमाची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण ५०० ग्रॅम वजनाचा 'कोकेन' हा अमली पदार्थ मिळून आला. अटक आरोपीविरुध्द एनडीपीएस ऍक्ट १९८५च्या कलम ८ (क) सह २१ (क) आणि परदेशी नागरीक कायदा सह कलम १४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी मूळ नायजेरिया येथील असून तो सध्या नवी मुंबईतील जुईनगर येथे राहतो. तो तेथे कपड्याचा व्यवसाय करत असल्याचे पोलिसांना त्याने तपासात सांगितले. हा आरोपी अमली पदार्थ खरेदी विक्री करीत असून त्याची एक मोठी टोळी असल्याची शक्यता असून त्याचा आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करीत सहभाग असण्याची शक्यता आहे.

 

हा आरोपी आग्रीपाडा येथे कोणाला कोकेन विकणार होता. या अमली पदार्थ तस्करीत सहभाग असलेल्या अन्य इसमांची नावे उघड होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकAnti Narcotic Cellअमली पदार्थविरोधी पथकMumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस