शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये सहावीतील विद्यार्थिनीवर अतिप्रसंग; शिक्षक, मुख्यध्यापक निलंबित, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई

By संजय पाठक | Updated: February 8, 2025 18:13 IST

इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस

संजय पाठक, नाशिक: इगतपुरी तालुक्यातील टाकेद बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली असून भारत सर्व सेवा संघ, पाचेगांव ता. नेवासा जि. अहिल्यानगर संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे इयत्ता सहावीत शिकणाऱ्या १२ वर्षीय विद्यार्थीनीसोबत मुख्यध्यापकाने वर्गशिक्षकाच्या मदतीने अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. यानंतर तातडीने मुख्याध्यापक तुकाराम साबळे वर्गशिक्षक गोरख जोशी या दोघांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यानुसार संस्थेने कारवाई केली.

या प्रकरणातील दोषी शिक्षक व मुख्यध्यापकावर भारतीय न्याय संहिता आणि बाल संरक्षण व अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर तातडीने मुख्याध्यापक तुकाराम साबळे, वर्गशिक्षक गोरख जोशी या संशयित आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, आज इगतपुरी तालुक्यात असलेल्या शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या घटनेची गंभीरपणे दखल घेत दोन्ही आरोपींना सेवेतून बडतर्फ करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. यानुसार कार्यवाही करत शिक्षक व मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या गुन्ह्याचा गंभीरपणे तपास करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पोलीस अधीक्षक नाशिक यांना मंत्री भुसे यांनी दिले आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थीsexual harassmentलैंगिक छळEducationशिक्षण