शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अंबाझरीतील पबमध्ये राडा; टोळक्याची बाउन्सरसोबत हाणामारी, पिस्तूल काढल्याचीही चर्चा 

By नरेश डोंगरे | Updated: November 19, 2023 07:20 IST

शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर धरमपेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती.

 नागपूर : धरमपेठ मधील एका बहुचर्चित पब मध्ये एंट्रीच्या मुद्द्यावरून वाद झाल्यानंतर गुन्हेगाराच्या एका टोळक्याने जोरदार राडा केला. यावेळी एका आरोपीने पिस्तूलही काढल्याची जोरदार चर्चा आहे. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडल्यानंतर धरमपेठ परिसरात दहशत निर्माण झाली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठ मध्ये आजूबाजूला दोन पब आहेत. येथे सॅटर्डे नाईटला मोठी रक्कम घेऊन तरुण-तरुणींना इंट्री दिली जाते. तेथे मद्यपान आणि अन्य प्रोग्राम होतात. उच्चभ्रू तरुण तरुणी येथे येत असल्याने गुन्हेगारांचीही त्यांच्यावर नजर असते.

आज सॅटर्डे नाईटला असाच प्रकार झाला. रात्री 11 ते 11:30 च्या सुमारास एक टोळके रास्ता मध्ये जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेथे बाचाबाची शिवीगाळ झाल्यानंतर बाजूच्या पब मध्ये हे टोळके आले. तिथेही एन्ट्री नाकारल्याच्या कारणावरून त्यांच्यासोबत पब संचालक आणि पाहून बाऊन्सरचा जोरदार वाद झाला. त्यानंतर या टोळीतील आरोपींनी आपल्या काही गुंड साथीदारांना बोलवून घेतले. 

जोरदार हाणामारीनंतर त्या ठिकाणी यावेळी पिस्तुल काढण्याचीही चर्चा होती. दरम्यान, या प्रकारामुळे पब मध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. तरुणींची आरडा ओरड धावपळ सुरू झाल्यानंतर कोणीतरी माहिती दिल्यावरून अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काहीना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेले. ही माहिती कळताच दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात साथीदार पोहोचल्याने परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी या संबंधाने अंबाझरी पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून तक्रार मिळाल्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरवू ,अशी माहिती दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर