शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरात पारधी समाजाच्या पालावर सशस्त्र हाणामारी; एकाचा मृत्यू,तीन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 00:55 IST

नवस फेडण्याच्या कार्यक्रमादरम्यन किरकोळ कारणावरून मलकापूर शहरातील बसस्थानकानजीक असलेल्या हनुमाननगर परिसरात पारधी समाजाच्या पालावर सोमवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली.

बुलडाणा - नवस फेडण्याच्या कार्यक्रमादरम्यन किरकोळ कारणावरून मलकापूर शहरातील बसस्थानकानजीक असलेल्या हनुमान नगर परिसरात पारधी समाजाच्या पालावर सोमवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत अंजनगाव सुर्जी येथील २० वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.या घटनेत लवर्या अजवास पवार हा ठार झाला असून तो अंजनगाव सुर्जी येथील रहिवाशी आहे. दरम्यान चरण पवार, कुतूर पवार आणि बॉबी कैलास पवार हे तीघे जखमी झाले आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रात्री बारा वाजेच्या सुमारास अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पारधी पालावर नवस फेडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान किरकोळ कारणावरून पालावरी दोन गटात वाद होऊन ही घटना घडली. रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी असलेल्या लवर्या अजवास पवार याचा बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री सव्वा ११ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. अन्य जखमींवर प्रथमोपचार करून त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. या घटनेतील मृतक हा अंजनगाव सुर्जी येथील असून अन्य जखमी हे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील असल्याची माहिती रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून