शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! गुदाशयात ४२ लाखांचं सोनं लपवून दिल्लीला जात होता तस्कर, विमानतळावर 'असा' झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 12:15 IST

तस्करानं चक्क आपल्या गुदाशयात ९०८.६८ ग्रॅम इतक्या वजनी सोन्याची एकूण चार पाकिटं पेस्ट गुदाशयात लपवून ठेवली होती. 

इन्फाळ विमानतळावर सीआयएफएफ आणि कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका बड्या तस्कराला अटक केली आहे. संबंधित तस्कर तब्बल ९०० ग्रॅम पेक्षाही अधिक सोनं ज्याची जवळपास किंमत ४२ लाख रुपयांच्या आसपास असून ते गुदाशयात लपवून घेऊन जात असल्याचं उघडकीस आलं आहे. 

सोन्याची तस्करी करण्यासाठी अटक करण्यात आलेल्या हा आरोपी इन्फाळहून दिल्लीला जात होता. त्यानं ९०० ग्रॅमहून अधिक वजनाच्या सोन्याची पेस्ट तयार केली होती आणि ती गुदाशयात लपवली होती. विमानतळावर प्रवाशांच्या होणाऱ्या तपासात सीआयएसएफ आणि कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना संबंधित व्यक्तीबाबत शंका आली. त्यानंतर अधिक तपासणी केली असताना तस्करानं चक्क आपल्या गुदाशयात ९०८.६८ ग्रॅम इतक्या वजनी सोन्याची एकूण चार पाकिटं पेस्ट गुदाशयात लपवून ठेवली होती. 

'एक्स-रे' मधून सारं उघडकीस आलंअटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव मोहम्मद शरीफ असं असून तो केरळच्या कोझिकोड येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. आरोपी दुपारी २.४० वाजताच्या फ्लाइटनं इन्फाळहून दिल्लीसाठी रवाना होणार होता. अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आरोपीला सुरक्षा चाचणीसाठी थांबवण्यात आलं आणि काही प्रश्नांची त्यानं समाधानकारक उत्तरं दिली नाहीत. त्यामुळे संशय बळावला. अधिकाऱ्यांनी त्याची मेडिकल तपासणी करण्याचा निर्णय घेतला आणि शरीराच्या खालच्या भागाचा एक्स-रे काढण्यात आला. यात गुदाशयात गोल्ड पेस्ट लपवल्याचं पाहून सर्वांनाच धक्का बसला. एक्स-रे चाचणीत भांडाफोड झाल्यानंतर आरोपीनं सर्व आरोप मान्य केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGoldसोनं